अकोला,
chargesheet-filed-against-accused-akola खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ सराईत गुन्हेगारांच्या टोळीविरुद्ध भारतीय न्याय संहीता २०२३ या कायदयामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या संघटित गुन्हेगारी कलम १११ अंतर्गत कारवाई करून जिल्हा व सत्र न्यायालय, अकोला येथे सदर गुन्हयाचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.त्यामुळे यापुढे सुध्दा अशा प्रकारे कोणीही गंभीर स्वरुपाचे गुन्हे केल्यास गुन्हेगारांवर मकोका, एमपीडीए, अशा योग्य त्या कारवाया करण्यात येणार असल्याचा ईशारा जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिला.

१७ जुलै २०२५ रोजी पोलीस स्टेशन खदान येथे फिर्यादी पंकज माधवराव धांडे वय ३४ वर्ष रा. लहरिया नगर, कौलखेड अकोला यांनी आरोपी सचिन मुकुंद बलखंडे वय ३० वर्षे, स्वप्नील बसवंत वानखडे वय २८ वर्षे, रुषभ अशोक काळे वय २५ वर्षे, अमित पवन गवळी वय २३ वर्षे, साहिल प्रमोद मालोकार वय २३ वर्षे, तन्मय संजय जोशी वय २३ वर्षे, पंकज गजानन थुटे वय २५ वर्षे, संजय कच्चरूलाल जोशी वय ४५ वर्षे, अभिजित उर्फ गोलु रामेश्वर हिंगणे वय २८ वर्षे, निखिल दिलीप बलखंडे वय २३ वर्ष, अंकुश उर्फ अंगद विशाल खरात वय २० वर्षे यांनी फिर्यादी यांना पैसे देण्याचे कारणावरून बोलावुन त्यांना बंद घरात कोंडुन त्यांचे अंगावरील सोन्याचे दागीने व पैसे जबर मारहाण करून हिसकावनु घेतल्या बाबतची तकार दिली होती. chargesheet-filed-against-accused-akola आरोपीतांविरूध्द विविध कलमनाव्ये गुन्हा दाखल करण्यात आला होते.
गुन्हयांतील ११ आरोपीतांची या गुन्हयासहीत मागील १० वर्षाचे अभिलेख तपासले असता सचिन मुकुंद बलखंडे वय ३० वर्षे (टोळीप्रमूख) याने स्वतःच्या नेतृत्वाखाली संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली असुन त्यामध्ये वेगवेगळे सदस्य घेवुन, वर्चस्व प्रस्थापीत करत आहे तसेच हिंसाचाराचा वापर करुन खुनाचा प्रयत्न करणे, मृत्यु किंवा जबर दुखापत घडवुन आणण्याच्या प्रयत्नांसहित जबरी चोरी किंवा दरोडा यासारखे गंभीर गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. chargesheet-filed-against-accused-akola दहा वर्षांत त्यांच्या विरोधात विविध प्रकरणांत दोषारोपपत्र दाखल झाले असून न्यायालयाने त्यांची दखल घेतली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, बी. चंद्रकांत रेड्डी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोउपनि. माजीद पठाण, पोहेकॉ. ज्ञानेश्वर सैरिसे पोकॉ. उदय शुक्ला, तसेच पोलीस स्टेशन खदान येथील पो.नि. मनोज केदारे, सपोनि निलेश करंदीकर पोलीस अमंलदार शंकर डाबेराव, धुरंधर, रवि काटकर, आकाश राठोड यांनी केली.