नागपूर,
cultural festival committees आमदार सांस्कृतिक महोत्सव समिती मध्य नागपूर तर्फे विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवार, १ नोव्हेंबरला रेशिमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजक सुबोध आचार्य यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी माजी नगरसेविका श्रध्दा पाठक, श्रेयस कुंभारे, अक्षय ठवकर आदी उपस्थित होते.
मध्य नागपूरचे आमदार प्रविण दटके यांच्या संकल्पनेतील आमदार सांस्कृतिक महोत्सव समिती तर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात प्रामुख्याने शिवकालीन किल्ले स्पर्धा, रासगरबा, महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धा, सार्वजनिक शारदा उत्सव मंडळ सजावट इकोफ्रेंडली गणेशमुर्ती प्रशिक्षण आदी घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळयाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील.cultural festival committees इतर उपस्थितांमध्ये भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे, दक्षिणचे आमदार मोहन मते, मध्यचे आमदार प्रविण दटके, विधानपरिषद आमदार जोशी, माजी आमदार विकास कुंभारे, माजी आमदार गिरीष व्यास, माजी आमदार नागो. गाणार, माजी आमदार अशोक मानकर, गांधीबाग मंडळ अध्यक्ष अॅड संजय बालपांडे, इतवारी मंडळाचे श्याम चांदेकर, महाल मंडळाचे अध्यक्ष अनिल मानापुरे आदी उपस्थित राहतील. या सोहळयाचे मुख्य आकर्षण बासुरीवाला अॅण्ड बॅडचे शुभम चोपकर हे राहतील.