अकोला,
weapons-seized-from-hiwarkhed ऑपरेशन प्रहार अंतर्गत हिवरखेड पोलीसांनी घरातून तीन तलवारी, एक पिस्टल असा घातक शस्त्र साठा जप्त करुन एकुण १६ हजार ३०० रुपयाचा मुददेमाल हस्तगत केला. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे निर्देशाप्रमाणे जिल्हयामध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्याविरोधात ऑपरेशन प्रहार मोहिम राबविण्यात येत आहे.

मंगळवार २८ रोजी पोलीस स्टेशन हिवरखेड पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की, हिवरखेड शहरातील लकी कॉलनी मधील आरोपी समीरोददीन शरीफोददीन, व आरोपी नामे शरीफोददीन इकामोददीन यांनी त्यांच्या राहत्या घरात अग्नीशस्त्र व धारदार लोखंडी शस्त्र अवैधरित्या लपवुन ठेवले आहे.या गोपनिय माहितीच्या आधारे आरोपीच्या बंद घराची पंचाचे समक्ष झडती घेतली असता घरातील एका खोलीमध्ये तीन तलवार, एक पिस्टल आढळून आली. weapons-seized-from-hiwarkhed पोलिसांनी आरोपीवर विविध कलमनाव्ये अन्वये गुन्हा दाखल करुन तपासात घेतला.ही कारवाई पोलीस अपर पोलीस अधीक्षक बी. रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोट निखील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राठोड, पोहेकॉ प्रमोद चव्हाण, पोहेकॉ पंकज मडावी, पोकॉ अमोल बुंदे, पोकॉ आकाश गजभार, पोकॉ प्रमोद भोंगळ, मपोकॉ नेहा सोनोने यांनी केली