गावाचा सरपंच ते प्राचार्य पदापर्यंतचा अचंबित करणारा प्रवास

30 Oct 2025 17:34:24

From village sarpanch to principal
 
गडचिरोली, 
From village sarpanch to principal गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सदस्य आणि प्राध्यापकांच्या वर्तुळातील हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असणारे डॉ. नंदाजी सातपुते यांची शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली येथे प्राचार्य म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावाच्या सरपंच पदापासून ते एस. टी. बस कंडक्टर आणि त्यानंतर प्राचार्य पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा प्रेरणादायी ठरला आहे. सातपुते हे सर्वांना सढळपणे मदत करणारे, संवेदनशील आणि आपुलकी जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शैक्षणिक कार्यात प्रामाणिकता आणि समर्पण हेच त्यांच्या यशाचे गमक असल्याचे सहकार्‍यांनी सांगितले. गडचिरोलीत शिक्षण व समाजसेवा या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य आणि सर्वांना जोडून ठेवण्याची त्यांची वृत्ती यामुळेच ही निवड त्यांच्या कार्यकर्तृत्वावर उमटलेली मोहोर ठरली आहे. त्यांच्या प्राचार्यपदी निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Powered By Sangraha 9.0