हमीरपूर,
Love-Crime-News : उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील मौदाहा पोलीस स्टेशन परिसरातील परछच गावात प्रेमप्रकरणातून एक हृदयद्रावक घटना घडली. लग्नाला विरोध करण्यासाठी आलेल्या प्रियकराला प्रेयसीच्या कुटुंबीयांनी दोरीने बांधून काठ्यांनी बेदम मारहाण केली, यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी संध्याकाळी घडली. मृत युवकाचे नाव रवी असून तो बांदा जिल्ह्यातील पैलानी शहरातील रहिवासी आहे.
 
 
 
 
रवी आपल्या चुलत बहिणी मनीषावर प्रेम करत होता. मनीषाचे लग्न दुसऱ्या व्यक्तीशी ठरल्याचे समजताच रवी थेट तिच्या गावात पोहोचला. तो मनीषाच्या खोलीत गेला, पण तिच्या काकाने त्याला पाहून बाहेर ओढले आणि इतर कुटुंबीयांसह त्याला मारहाण केली. रवीला दोरीने शेतात बांधण्यात आले आणि काठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली, ज्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
 
या घटनेची माहिती मिळताच मनीषाने चाकूने गळा आणि मनगट कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कानपूरला रेफर केले आहे.
 
रवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मुकेश, पुट्टन, बल्ली, काली आणि सुभेदार उर्फ मुन्नी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. चार आरोपी ताब्यात आहेत.
 
जूनमध्ये रवी एकदा मनीषासह पळून गेला होता, पण पोलिसांनी दोघांना पकडून मुलीला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले. या घटनेनंतर रवी पुन्हा तिच्यासोबत राहण्यासाठी प्रयत्न करत होता, मात्र शेवटी त्याचे प्रेम दुर्दैवी शेवटाकडे गेले.