हिंगणघाटात नातीने केली आजीच्या घरी चोरी

30 Oct 2025 19:50:57
हिंगणघाट, 
hinganghat-theft-case : युवा पिढी दिखाव्यावर जात असल्याचे जीवंत उदाहरण हिंगणघाट पोलिसांनी दाखल गुन्ह्याचा छडा लावलेले प्रकरण ठरत आहे. नातीने आजीच्या घरी चक चोरी करून कार, दुचाकी व आयफोनची खरेदी केली. हे सर्व साहित्य व चोरीचे सोनं पोलिसांनी जप्त केले आहे.
 

JK 
 
 
 
हिंगणघाट पोलिस ठाण्यात हिंगणघाट येथील पौर्णिमा इंद्रनिल रंगारी यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार त्यांच्या घरातून चोरट्याने ६० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगडया, सोन्याच्या ३ अंगठ्या, सोन्याच्या २ नथ, २० ग्रॅमचे कानातील २ टॉप्स असा ८० ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुद्देमाल चोरून नेला. संबंधित प्रकरणी तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यावर पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी पौर्णिमा यांची नात पूर्वा रंगारी हिला ताब्यात घेत विचारपूस केली असता तिने आजीच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली.
 
 
इतकेच नव्हे तर चोरीच्या मुद्देमालाची विल्हेवाट तिचा मित्र वंश राऊत रा. हिंगणघाट याच्या माध्यमातून केली. या कामात तिला रुपाली प्रमोद राऊत रा. हिंगणघाट हिने सहकार्य केले. याच चोरीचा मुद्देमाल विक्री केल्यावर मिळालेल्या पैशातून तिने कार, दुचाकी व एक आयफोन खरेदी केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी कार्यवाही करून मुद्देमाल जप्त केला. ज्या सोनाराला चोरीचे सोने विकले त्याच्याकडून ८० ग्रॅम सोनही पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशीव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील नायक, ठाणेदार अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वानखडे, पद्ममाकर मुंडे, प्रशांत ठोंबरे, राजेश शेंडे, आशिष नेवारे, मंगेश वाघमारे, रोहीत साठे, अनुप कावळे, दिनेश बोथकर यांनी केली.
Powered By Sangraha 9.0