पाऊस आला चिखल झाला भिजली हरीची वीणा हो..!

30 Oct 2025 19:44:04
श्याम पांडे, दारव्हा
Kakad Dindi, परंपरेनुसार चालत आलेला आखाडी पौर्णिमेपासून सुरू झालेला चातुर्मास त्यात शहरी व ग्रामीण भागातील मंदिरांमधून पहाटे काकड दिंड्या निघतात. आल्हाददायी वातावरण आणि सुमधुर स्वरांनी सर्वत्र सकारात्मक भक्तिमय वातावरण निर्माण करण्याची क्षमता या काकड दिंडीमध्ये असते. कोजागरी पौर्णिमेपासून सुरू होणाèया काकड दिंडी व आरतीची परंपरा फार पुरातन असून आजही दारव्हा शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये सुरू आहे. गुरुवार, 30 ऑक्टोबरला सकाळी भर पावसात अनेक शहरातील तसेच ग्रामीण भागातील मंदिरामधून काकडदिंड्या निघाल्या.
 
 

Kakad Dindi, Daryapur traditions, Ashadhi Pournima, Kojagiri Pournima, Chaturmas rituals, devotional procession, spiritual unity, bhajan and abhang, Panduranga devotion, Kakad Aarti, rural Maharashtra culture, Warkari tradition, temple rituals, community harmony, social integration, Marathi devotional songs, spiritual awakening, religious customs Maharashtra, cultural heritage, rainy season procession 
पहाटेच्या शांत वातावरणात भक्तांनी मंदिरात जमून, काहींनी भर पावसात नगरातून फिरून परत मंदिरात येऊन काकडआरती केली. दिवसाची सुरुवात भगवंताच्या नामस्मरणाने झाही की मनाला बळ मिळते, हा अनुभव ज्येष्ठ मंडळी सांगतात. सकाळी काकड आरतीमध्ये गायल्या जाणारे अभंग, धन्य आज दिन संत दर्शनाचा घेई घेई माझे वाचे, गोडनाम विठ्ठलाचे, उठ पंढरीच्या राया फार वेळ झाला, उठ सूर्यनारायणा, चला पंढरीला जाऊ सारे वारकरी होऊ, या अभंगांनी केवळ मंदिरच नव्हे तर संपूर्ण गावाचे वातावरण मंगलमय आणि आल्हाददायक होते. काकड आरतीवेळी भजन, अभंग, भारूड, संतांचे अभंग, गौळण आणि मंत्रांचे उच्चारण केले जाते. यामुळे भाविकांना एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा मिळते. काकडआरती केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित राहत नाही तर सामाजिक एकोप्याचे प्रतीक बनते.
गावकèयांनी एकत्र येऊन काकड आरती करणे, हा एक प्रेरणादायी उपक्रम ठरतो. यामुळे समाजामध्ये बंधुता आणि एकोपा टिकून राहतो. काकड आरतीमुळे केवळ भक्तीचे प्रदर्शन होत नाही, तर त्यातून मिळणाèया सकारात्मक ऊर्जेने सर्वांनाच नवचैतन्य मिळते. भक्तांनी एकत्र येऊन केलेल्या या प्रार्थनेमुळे दिवसभर उत्साह टिकून राहतो. या काकड दिंडीच्या मार्गावर सुंदर रांगोळ्या काढून माता-भगिनी दिवेही उत्साहाने लावतात.
Powered By Sangraha 9.0