ड्युटीवर मद्यसेवन करणाऱ्यांना आता माफी नाही...

30 Oct 2025 18:30:19
मुंबई,
Pratap Sarnaik महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) ड्युटीवर मद्यसेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार २८ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यव्यापी अचानक तपासणी मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत चालक, कंडक्टर आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची मद्यसेवन तपासणी करण्यात आली, ज्यात एकूण १७०१ कर्मचाऱ्यांची चौकशी झाली.
 

Pratap Sarnaik 
तपासणीत Pratap Sarnaik ड्युटीवर मद्यसेवन करताना सात कर्मचाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले. यामध्ये एक चालक, चार तांत्रिक कर्मचारी, एक सफाई कामगार आणि एक कंडक्टर यांचा समावेश आहे. विभागनिहाय तपशील पाहता, धुळे जिल्ह्यात एक चालक, एक तांत्रिक कर्मचारी आणि एक सफाई कामगार दोषी ठरले. नाशिकमध्ये एक चालक, परभणी आणि भंडारा येथे प्रत्येकी एक तांत्रिक कर्मचारी दोषी ठरले, तर नांदेडमध्ये एक कंडक्टर दोषी ठरला. या सर्वांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून पुढील शिस्तभंग कार्यवाही सुरू आहे.
परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, "एसटीमध्ये मद्यपी कर्मचाऱ्यांना कुठलाही आश्रय मिळणार नाही. प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्यांवर दया दाखवली जाणार नाही." यासह, सुरक्षा विभागाला नियमित आणि अनपेक्षित तपासण्या चालू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
 
 
भविष्यात, नवीन बस Pratap Sarnaik  वाहनांमध्ये चालकाच्या सीटजवळ ब्रेथ ॲनलायझर यंत्र बसवण्याची योजना आहे, ज्यामुळे मद्यसेवन करणाऱ्यांवर त्वरित प्रतिबंध केला जाईल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाईल. मंत्री सरनाईक म्हणाले की, "एसटी ही जनवाहिनी असल्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता हा प्रथम प्राधान्याचा मुद्दा आहे. ही कारवाई सार्वजनिक वाहतुकीत अनुशासन सुधारेल आणि गैरवर्तनाला आळा बसेल."या मोहिमेचे जनतेकडून कौतुक होत असून, त्यामुळे एसटीची सेवा अधिक विश्वासार्ह आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0