छठ सणाचा अपमान म्हणजे मातांचा अपमान!

30 Oct 2025 11:55:07
नवी दिल्ली,
Modi's attack on Congress-RJD पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काँग्रेस आणि राजदवर तीव्र टीका करत बिहारच्या श्रद्धेचा प्रश्न उपस्थित केला. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सभेत त्यांनी म्हटलं, जे लोक मतांसाठी छठी मताची पूजा नाटक आणि चाल असल्याचं म्हणतात, त्यांनी बिहारच्या संस्कृतीचा अपमान केला आहे. बिहारच्या माता-भगिनी हा अपमान कधीच सहन करणार नाहीत.
 

Modi 
 
मोदी म्हणाले की, छठी मातेची आराधना ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून ती निष्ठा, करुणा आणि समानतेचं प्रतीक आहे. निर्जल व्रत करणाऱ्या महिलांना अपमानित करणं हे अत्यंत लाजिरवाणं आहे. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही निशाणा साधत म्हटलं, “त्यांचा मुलगा जगभरात छठी मातेची स्तुती करतो, आणि दुसरीकडे त्यांचे साथीदार तिचा अपमान करतात. हा किती मोठा दुटप्पीपणा आहे?
बिहारमधील जनतेला उद्देशून पंतप्रधान म्हणाले, “राजद आणि काँग्रेसकडून केवळ हिंसाचार, क्रूरता, कुशासन आणि भ्रष्टाचार मिळाला आहे. जंगलराजमध्ये कायदा संपला, समाज तुटला आणि विकास थांबला. बिहारला आता स्थिर सरकार, उद्योग, वीज आणि कायद्याचं राज्य हवं आहे, पण ज्यांनी राज्याला कंदीलयुगात ठेवलं ते हे देऊ शकतील का?”
 
मोदी पुढे म्हणाले, “छठ हा सण बिहार आणि देशाचा अभिमान आहे. सूर्यदेव आणि छठी मय्येचं पूजन हे मातांच्या श्रद्धेचं प्रतीक आहे. ही पूजा सामाजिक सौहार्द आणि समतेचं दर्शन घडवते. आमचं सरकार या मूल्यांना जगभर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सभेच्या शेवटी मोदींनी बिहारच्या जनतेला आवाहन केलं की, “जे आपल्या श्रद्धेचा अपमान करतात, त्यांना लोकशाहीत उत्तर द्या. छठी मातेचा आशीर्वाद बिहारच्या विकासासाठी आवश्यक आहे, आणि तोच आमचा संकल्प आहे.”
Powered By Sangraha 9.0