नागपूर-जबलपूर महामार्गावर भीषण अपघात; तीन ठार, अनेक जखमी

30 Oct 2025 15:47:06
नागपूर,
Nagpur-Jabalpur highway accident नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (दि. 29 ऑक्टोबर) दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास भयानक अपघात झाला. वडंबा शिवारात झालेल्या या अपघातात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, एक गंभीर जखमी तर अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
 

Nagpur-Jabalpur highway accident 
जबलपूरकडून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या सत्यम ट्रॅव्हल्स (एमपी २२ झेडजी ५८२२) आणि नागपूरहून जबलपूरच्या दिशेने येत असलेल्या कार (एमपी २० झेडए ००१४) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. माहितीप्रमाणे, समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि कार विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जात ट्रॅव्हल्सला धडकली. या धडकेत कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.
 
 
धडकेनंतर ट्रॅव्हल्स चालकाने वाहन बाजूला केले असता, महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रक (आरजे ११ जीसी ६६३) ला ट्रॅव्हल्सची धडक बसली. या धडकेतही काही गंभीर जखमी झाले आहेत.
 
 
घटनेची माहिती Nagpur-Jabalpur highway accident  मिळताच देवलापार पोलिस तसेच ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी येथील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्ग वाहतूक सुरळीत केली.अपघातात जखमी झालेल्यांमध्ये रूपचंद मारुती दिवटे (वय ६२, रा. काळा फाटा, ता. पारशिवनी), शकुंतला रूपचंद दिवटे (वय ५४), ट्रॅव्हल्स चालक राजू कंचनलाल बौरसिया (वय ३५, रा. केवलारी, खैरी, सिवनी), हेल्पर संजय जुमनलाल मरसकोल्हे (वय २१, रा. घोगरी, सिवनी), बस कंडक्टर संजय रवी यादव (वय ३२, रा. दुर्गा चौक, लखनौ), प्रवासी संदीप टिकाराम करेंगे (वय ३२, छपरा, सिवनी), तालन सुजन सिंग (वय ७४, रा. बिछया, छिंदवाडा) यांचा समावेश आहे.पोलिसांनी सर्व जखमींवर तातडीने प्राथमिक उपचार करून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0