फ्लोरिडात H-1B व्हिसावर भरती थांबवण्याचे आदेश!

30 Oct 2025 12:33:15
फ्लोरिडा,
Order on H-1B visas in Florida अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्याचे गव्हर्नर रॉन डीसँटिस यांनी उच्च शिक्षण संस्थांमध्ये H-1B व्हिसाचा गैरवापर थांबवण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. त्यांनी फ्लोरिडा बोर्ड ऑफ गव्हर्नर्सना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, राज्यातील विद्यापीठांनी परदेशी कामगारांऐवजी अमेरिकन नागरिकांना प्राधान्याने नोकरी द्यावी. गव्हर्नर डीसँटिस यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, देशभरातील अनेक विद्यापीठे पात्र आणि उपलब्ध अमेरिकन उमेदवार असतानाही H-1B व्हिसावर परदेशी नागरिकांची नियुक्ती करत आहेत. त्यांनी ठामपणे सांगितले, “फ्लोरिडा संस्थांमध्ये H-1B व्हिसाचा गैरवापर आम्ही अजिबात सहन करणार नाही. म्हणूनच ही पद्धत तातडीने थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
 
 
Order on H-1B visas in Florida
डीसँटिस पुढे म्हणाले की, जर एखाद्या विद्यापीठाला खरोखरच पदे भरायची असतील, तर त्यांनी त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमांचा आढावा घेऊन हे पाहावे की, आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना त्या नोकऱ्यांसाठी का तयार करता येत नाही.राज्यपाल कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, फ्लोरिडा सरकार अपेक्षा करते की सर्व संस्थांनी अमेरिकन पदवीधरांना रोजगारात प्राधान्य द्यावे, तसेच करदात्यांच्या पैशाने चालणाऱ्या विद्यापीठांचा वापर स्वस्त परदेशी कामगार आणण्यासाठी केला जाणार नाही याची खात्री करावी.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, H-1B व्हिसा हा विशिष्ट कौशल्याधारित व्यवसायांसाठी असतो, मात्र अनेक विद्यापीठांनी असे काम देखील परदेशी कर्मचाऱ्यांकडून करून घेतले आहे, जे स्थानिक अमेरिकन नागरिक सहजपणे करू शकतात. विद्यापीठांना या व्हिसा योजनेतील “फेडरल कॅप” म्हणजेच मर्यादेतून सूट दिली गेली असल्याने त्यांना वर्षभर परदेशी कामगार घेण्याची मुभा आहे, आणि याचाच गैरवापर होत असल्याचे डीसँटिस यांनी म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0