सुधीर दळवीच्या मदतीला आली रिद्धिमा कपूर!

30 Oct 2025 13:39:30
मुंबई,
Riddhima aid of Sudhir Dalvi "शिर्डीचे साई बाबा" या प्रसिद्ध टीव्ही मालिकेत साईंची भूमिका साकारून लोकांच्या मनात स्थान मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी सध्या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. त्यांना सेप्सिस हा जीवघेणा संसर्ग झाल्यामुळे त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांच्या उपचारांचा खर्च तब्बल १५ लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
 
 
Riddhima aid of Sudhir Dalvi 
अभिनेता सुधीर दळवींच्या कुटुंबीयांनी त्यांच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीची विनंती केली होती. यानंतर रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी मदतीसाठी पुढे आल्या. त्यांनी आर्थिक मदत केल्याचं सांगत सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली. पोस्टमध्ये रिद्धिमाने लिहिलं हे पूर्ण झालं आहे, मी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देते. दरम्यान, ८६ वर्षीय सुधीर दळवी यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असून, डॉक्टरांच्या सतत देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्यासाठी अनेक चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी प्रार्थना व्यक्त केल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0