रोहयोच्या मुदतवाढीने 469 कामांना मिळणार गती

30 Oct 2025 15:52:31
यवतमाळ,
Rohyo's work accelerates रोजगार हमी योजनेद्वारे जिल्ह्यात अनेक कामे सुरू असतात. यातील वैयक्तिक स्वरूपाच्या कामांमध्ये अनेक अडचणी येतात. अशाच प्रकारे अपूर्ण असलेली कामे येत्या 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे आदेश आहेत. यामुळे आता जिल्ह्यातील 469 कामे मार्गी लागणार आहेत. यामध्ये विहिरी, गोठे आणि फळबागांचाही समावेश आहे. या आदेशामुळे शेतक-यांना सिंचन विहिरी, फळबाग, गोठे अशी रखडलेली अनेक कामे पूर्ण करता येणार आहेत. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची 469 कामे प्रलंबित होती. शासनाच्या अध्यादेशाने आता या कामांना पुन्हा नव्याने गती मिळणार आहे.
 
 

Rohyo 
 
सिंचन विहिरी करण्यासाठी शेतकèयांना मोठ्या आर्थिक तरतुदीची आवश्यकता असते. प्रारंभ काम केल्यानंतरच रोजगार हमी योजनेतून विविध टप्प्यावर निधी वळता होतो. मात्र प्रारंभीचे काम करण्यासाठी निधीची आवश्यकता असते. या निधीची जुळवाजुळव न झाल्याने अनेक शेतकरी नैराश्येत होते. आता हा निर्णय शेतकèयांना सिंचनातून समृद्धीची बळकटी देणार आहे. फळबाग लागवड, गोठा या माध्यमातून शेतक-यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. फळबागेने शेतक-यांचे उत्पन्न वाढेल. गोठ्यात दुग्ध व्यवसाय आणि इतर सहायक व्यवसाय करण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. 2022-23 पासून अपूर्ण राहिलेली कामे आता पुढील काळात करता येणार नाही, याची खंत लाभार्थ्यांना होती. मात्र, आता राज्य शासनाने या कामांसाठी मुदतवाढ दिल्याने लाभार्थ्यांचा पेच सुटला आहे. यामुळे प्रलंबित कामे मार्गी लागणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
Powered By Sangraha 9.0