सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

30 Oct 2025 19:40:56
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Sardar Vallabhbhai Patel Jayanti, सरदार वल्लभाई पटेल जयंतीनिमित्य 31 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल चौहान यांनी दिली.गुरुवार, 30 ऑक्टोबर रोजी विश्राम भवनात झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, जिल्हा महामंत्री राजू पडगिलवार मान्यवर उपस्थित होते.
 
 
dbhfg
पुढे बोलताना अ‍ॅड. चौहान म्हणाले, भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात पदयात्रा, निबंध स्पर्धा इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे.यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा परिषद मंडळांनुसार हे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. संपूर्ण देशभर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहनसुद्धा यावेळी करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0