स्मृती मंधानाचं कमाल! ऑस्ट्रेलियाविरुद्ध रचला नवा इतिहास

30 Oct 2025 20:19:49
नवी मुंबई,
Smriti Mandhana : भारतीय महिला संघ आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा सामना करत आहे. ऑस्ट्रेलियन संघाने ३३८ धावा केल्या. टीम इंडियाची स्टार ओपनर स्मृती मानधना २४ धावा करून बाद झाली, पण तिने एक मोठा टप्पा गाठला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध १००० धावा पूर्ण करणारी ती मिताली राजनंतरची दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली.
 
SMRUTI
 
 
 
मानधनाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१ सामन्यांत ५१ च्या सरासरीने १,०२० धावा केल्या आहेत, ज्यात चार शतके आणि सहा अर्धशतके समाविष्ट आहेत. मितालीने ३७ सामन्यांत १,१२३ धावा केल्या होत्या.
विश्वचषक २०२५ मध्येही स्मृती मानधना उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. तिने आठ सामन्यांत ५५.५७ च्या सरासरीने ३८९ धावा केल्या असून एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत ती सध्या दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्डच्या मागे दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Powered By Sangraha 9.0