कित्येक वर्षापासून बंद असलेला रस्ता अखेर केला मोकळा

30 Oct 2025 17:42:50
मंगरूळनाथ,
Success of the farmer's movement दै.तरूण भारत वृत्तपत्रात पोटी येथील शेतकर्‍यांसाठी शेतात जाणारा रस्ता अडवल्याबद्दलची बातमी २७ ऑटोंबर रोजी बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीच्या प्रभावाने मंगरूळनथ येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह जाधव यांनी तहसीलदार रवि राठोड, मंडळ अधिकारी संबंधित कर्मचार्‍यासह प्रत्यक्ष जाऊन स्थळाची पाहणी करून जेसीबी द्वारे शेतकर्‍यांच्या शेतातील रस्ता मोकळा करून दिला. तालुयातील पोटी येथील शेतकरी प्रशांत गावंडे व श्रीकांत गावंडे यांनी यांच्या शेताच्या समोर असलेल्या शेतकर्‍यांचा रस्ता अडवला असल्याबाबतचे निवेदन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मुख्यमंत्री यांचे निकटवर्ती अमोल पाटणकर यांची भेट घेऊन यांना रस्ता नसलेल्या पोटी येथील माजी सैनिक सुधीर सुडके, रमेश दोड, महादेव गावंडे, राजू गावंडे, गजानन गावंडे, ज्ञानेश्वर दोड या शेतकर्‍यांनी दिले होते. रस्ता अडवल्यामुळे शेतीत जाणे येणे कठीण झाले होते.
 
 
Success of the farmer
 
 
संबंधित सर्व शेतकरी सुडीवर चढून आत्मदहन करण्याच्या तयारीत होते तसेच जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक सुडके यांच्या अडचणी सोडवण्याकरिता घटनास्थळावर दाखल झाले होते. शेतकर्‍याला रस्ता तात्काळ उपलब्ध व्हावा त्यासाठी येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह जाधव व तहसीलदार डॉ.मिलिंद जगदाळे, रवि राठोड, उपअधीक्षक भूमिअभिलेख विवेक चारथर, भूमापक आर. डी. खेकडे, मंडळ अधिकारी श्रावने, के.के. चव्हाण, दिनेश राऊत, यांनी पोटी येथील आत्मदहन करणार्‍या शेतकर्‍यांच्या शेतात आपल्याला तात्काळ रस्ता उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले. उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार काही वर्षापासून रोखलेला रस्ता तात्काळ मोकळा करून देण्यात आला. तात्काळ रस्ता मोकळा झाल्यामुळे संबंधित शेतकर्‍यांनी आनंद व्यक्त करून सर्व अधिकारी कर्मचारी व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मुख्यमंत्र्याचे एसडीओ अमोल पाटणकर,आमदार श्याम खोडे यांचे आभार व्यक्त केले. 
 
 
शेतकर्‍यांना त्यांच्या शेतात ये- जा करण्याकरिता रस्ता उपलब्ध करण्याचे काम शासनाने हाती घेतलेले आहे. कुठल्याही शेतकर्‍यावर अन्याय होणार नाही व कुठलीही शेती बिना रस्त्याची राहणार नाही, याकरिता नियमानुसार काम करून शेतकर्‍यांच्या पाठीशी प्रशासन खंबीरपणे उभे आहे.
Powered By Sangraha 9.0