पांडुरंग तुळसकर यांना स्मृतिदिनी अभिवादन

30 Oct 2025 19:49:15
हिंगणघाट, 
Pandurang Tulskar : विद्या विकास शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. पांडुरंग तुळसकर यांचा प्रथम स्मृतिदिनी अभिवादन कार्यक्रम तुळसकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने आज ३० ऑटोबरला आयोजित करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. उमेश तुळसकर, सचिव डॉ. नयना तुळसकर, उपाध्यक्ष डॉ. निलेश तुळसकर, डॉ. राजविलास कारामोरे, डॉ. महेंद्र गुंडे, प्राचार्य नितेश रोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेतंर्गत चाललेल्या विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
J
 
डॉ. उमेश तुळसकर यांनी पांडुरंगजी यांचा संघर्षयुत जीवनपट उलगडून दाखवला. ही संस्था त्यांनी दाखवून दिलेल्या पाऊल वाटेवर चालत राहील, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणे व सर्वांना सोबत घेऊन चालत राहणे हेच आपले ध्येय असल्याचे ते म्हणाले. डॉ. नयना तुळसकर यांनी आपल्या व्यक्तीमत्त्वाची जडणघडण सासरे पांडुरंगजी यांच्यामुळेच झाली असल्याचे सांगितले.
 
 
डॉ. कारामोरे यांनी आपल्या दीर्घ अनुभवातून संस्थेच्या जडणघडणीत पांडुरंगजी तुळसकर यांचे योगदान व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवले. प्राचार्य डॉ. गुंडे यांनी त्यांच्या अल्पशा सहवासातून आपल्याला बरेच काही शिकता आल्याची जाणीव याप्रसंगी बोलून दाखवली. डॉ. निलेश तुळसकर यांनी केवळ त्यांच्यामुळेच या क्षेत्रात आपण आलो असल्याचे सांगुन दुसर्‍याच्या सूप्त गुणांना ओळखून त्यांना त्या क्षेत्राकडे वळविण्याची क्षमता पांडुरंगजी यांच्यात होती, असे सांगितले. प्राचार्य नितेश रोडे यांनी पांडुरंगजी यांच्या अनेक प्रेरक स्मृतींना उजाळा दिला. प्रा. अजय बिरे यांनी संचालन केले.
Powered By Sangraha 9.0