वंदे मातरम् साठी चीड येण्याचं कारण काय?

30 Oct 2025 17:36:50
मुंबई,
Vande Mataram controversy देशाचे राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ या गाण्याच्या निर्मितीला १५० वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने राज्य शासनाने नवीन आदेश जारी केला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरदरम्यान ‘वंदे मातरम्’ गाण्याचे वाचन करण्याचे आदेश तसेच या गीताचा इतिहास सांगणारे प्रदर्शन आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव अ. रा. कुलकर्णी यांनी शिक्षण आयुक्तांना परिपत्रकाद्वारे हे आदेश पाठवले आहेत.
 
 
 

Vande Mataram controversy 
परंतु, समाजवादी Vande Mataram controversy पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी या आदेशावर आक्षेप घेतला आहे. आझमींनी सांगितले की, "मुस्लिमांना ‘वंदे मातरम्’ म्हणण्यास भाग पाडणे चुकीचे आहे. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची श्रद्धा असते आणि त्याचा आदर केला पाहिजे. वंदे मातरम् बंधनकारक करणे योग्य नाही. मुस्लिम धर्माच्या आस्थेकडे लक्ष दिले पाहिजे आणि कोणत्याही गोष्टीची सक्ती करणं चुकीचं आहे."आझमींनी भाजपावरही टीका केली आणि म्हटले, "मतांसाठी भाजप काहीही करू शकते. मुस्लिम धर्मियांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. भाजप हिंदू-मुस्लिम विभागणी करत राहते. मुस्लिम दुःखी राहावा, हीच भाजपाची इच्छा असते. "मी पत्र देणार नाही, ना विरोध करणार. ज्यांना जे करायचं आहे, त्यांनी ते करावं," असेही स्पष्ट केले.दरम्यान, आझमींच्या या भूमिकेवर सत्ताधारी पक्ष भाजपने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाचे प्रसारमाध्यम समन्वयक नवनाथ बन यांनी सांगितले, "शाळेत वंदे मातरम् सुरु होणार, त्यात अबू आझमी यांना चीड येण्याचं काय कारण आहे? ‘वंदे मातरम्’ म्हणावंच लागेल. हे भारत भूमीला वंदन करण्याचा नारा आहे."
 
 
याचप्रमाणे, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आझमींच्या विरोधासंदर्भात खोचक टोला लगावला. देशपांडे म्हणाले, "अबू आझमीला कोण विचारत नाही म्हणून असे विधान करत आहे."राज्यातील शालेय स्तरावर ‘वंदे मातरम्’च्या वाचनासंदर्भातील हा आदेश आणि त्यावरून सुरू झालेला राजकीय वाद आगामी काळात अधिक चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0