वर्धेत १० एकरात होणार व्यवसाय कौशल्य विकास केंद्र

30 Oct 2025 19:47:40
वर्धा, 
business-skill-development-center : व्यावसायिक प्रगतीकरिता कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. याच संकल्पनेतून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी यशवंतराव चव्हाण मुत विद्यापिठाचे कौशल्य विकास केंद्र जिल्ह्यात आणण्याकरिता पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून विद्यापिठाकरिता १० एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. वास्तूच्या पहिल्या व दुसर्‍या टप्प्यातील बांधकामाकरिता १८५ कोटी रुपये देण्यात येणार आहे.
 
 
HJK
 
जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी वर्ध्यात कुशल कामगार निर्माण व्हावे याकरिता कौशल्य विकास केंद्र उभारण्याचा प्रस्ताव यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्याकडे सादर केला होता. त्याला हिरवी झेंडी देण्यात आली आहे. विद्यापीठ स्वनिधीतून भांडवली खर्च करणार आहे. तसेच शासनाच्या आर्थिक मदतीने सदर शैक्षणिक संकुल पुर्णत्वास नेण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुत विद्यापिठाचे विभागीय कार्यालय आणि निवासी व अनिवासी व्यावसायीक कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे. या भागात असणार्‍या शेती आणि शेती पूरक इतर लघु उद्योगांना पुरेशा प्रमाणात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.
 
 
स्थानिक गरजा पूर्ण करणे, रोजगार निर्मिती, उद्योग शिक्षण समन्वय, जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी अंतर्गत वाढवण पालघर येथील बंदरासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करणे, ई वाहन दुरुस्तीसाठी वर्कशॉप, लॉजिस्टिक पार्क, सर्वांसाठी शिक्षण, आदिवासी शिक्षण, संशोधन व विकास, कुटीर उद्योग प्रशिक्षण, प्रादेशिक भाषा अभ्यासक्रम, दिव्यांगांकरिता व्यावसायिक शिक्षण संधी, डिजिटल लर्निंग सेंटर, डिजिटल लर्निंग प्रयोगशाळा आदींच्या माध्यातून कामे करण्यात येणार आहे.
 
 
येथे विभागीय कार्यालय, व्यावसायिक व उद्योजकता विकास केंद्र, शैक्षणिक इमारात, ग्रंथालय, अभ्यासिका व संगणकीय लॅब, डिजिटल लर्निंग व दिव्यांगांसाठी प्रयोगशाळा, लॉजिस्टीक पार्क इमारत, स्वयंअध्ययन साहित्य भांडार या इमारती पहिल्या टप्प्यात बांधण्यात येणार आहेत. यावर ११५ कोटी खर्च करण्यात येणार आहे तर दुसर्‍या टप्प्यात विद्यार्थ्यांसाठी दोन वसतीगृह, इन्डोअर स्पोर्ट कॉम्प्लेस, विद्यार्थी भवन, अधिकारी आणि कर्मचार्‍यांची निवासस्थाने या इमारती बांधण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0