‘महिला आयोग आपल्या दारी’, 6 नोव्हेंबरला होईल जनसुनावणी

30 Oct 2025 17:31:15
गडचिरोली, 
Women's Commission at your doorstep राज्य महिला आयोगाच्या ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात गुरुवारी 6 नोव्हेंबर जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी घेण्यात येणार आहे. या जनसुनावणीत आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर स्वतः महिलांच्या तक्रारी ऐकून त्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. दरम्यान, महिला आयोगाच्या दौर्‍याच्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी बुधवारी संबंधित यंत्रणेची आढावा बैठक घेतली. महिलांशी संबंधित प्रलंबित तक्रारी तातडीने निकाली काढून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
 

Women 
 
राज्याच्या कानाकोपर्‍यांतील महिलांना न्याय मिळावा यासाठी आयोगाने जिल्हा स्तरावर थेट जनसुनावणीचा उपक्रम सुरू केला आहे. महिलांना मुंबई येथे तक्रार नोंदविणे किंवा सुनावणीसाठी येणे आर्थिक व इतर कारणांमुळे कठीण होते, त्यामुळे आयोगच जिल्ह्यांपर्यंत पोहोचत आहे. जनसुनावणीत पोलिस, प्रशासन, विधि सल्लागार, समुपदेशक आणि जिल्हा समन्वयक उपस्थित राहून तक्रारींवर तत्काळ कार्यवाही केली जाणार आहे, हे विशेष.
Powered By Sangraha 9.0