जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आरोग्य सहायकांचा दारू पिऊन धिंगाणा

30 Oct 2025 19:25:28
भंडारा,
bhandara-news : भंडारा जिल्हा परिषदेत आरोग्य सहायक कर्मचाऱ्यांचा दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे. मधुंद अवस्थेत या कर्मचाऱ्याने लेखा विभागातील अधिकाऱ्यांना शिवीगाळ दिली असून त्याचा व्हिडिओ आता चांगलाच वायरल होत आहे.
 

BHANDARA
 
 
 
भंडारा जिल्ह्याच्या मोहदूरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहायक पदावर कार्यरत असलेल्या विजय निंबार्ते नावाच्या व्यक्तीने जिल्हा परिषद मध्ये दारू पिऊन येत धिंगाणा घातला आहे. लेखा विभागातील कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ केली आहे. आता लेखा विभागातील कर्मचारी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले असून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.
Powered By Sangraha 9.0