हदगाव तालुक्यात सध्याच्या पावसानेसोयाबीन व हरभरा पिकांची मोठी हानी

31 Oct 2025 18:38:18
हदगाव, 
हदगाव तालुक्यातील केदारनाथ शिवार, सावरगाव (माळ) परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना महापूर आला आहे. या पुरामुळे परिसरातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेकांच्या Soybean and gram crops पिकांवर पाणी साचले आहे. सावरगाव (माळ) येथून वाहत येणारा ओढा पुढे पिंगळी तलावात मिळतो. मध्यरात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने या ओढ्याला प्रचंड पाणी आले. परिसरातील अनेक शेतांमध्ये पाणी घुसल्याने पिकांचे नुकसान झाले.
 
 
 
harbhara
 
खरबी गावचे शेतकरी कोंडबा खुपसे यांच्या शेताजवळून ओढा जात असल्याने त्यांचे सोयाबीन ताडपत्रीसह वाहून गेले. त्यांनी नुकतेच काढलेले सोयाबीन शेतात गोळा करून ठेवले होते. मात्र अचानक आलेल्या पूरामुळे सर्व पिक वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. याशिवाय परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी नुकतीच हरभरा पेरणी केली होती. पण सततच्या पावसामुळे ही Soybean and gram crops पेरणी पाण्याखाली गेली असून पिके नष्ट झाली आहेत. शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
 
 
Soybean and gram crops दरम्यान, गेल्या १५ दिवसांपूर्वी एका शेतकर्‍याची विहीर कड्यासह कोसळली होती. त्या घटनेचा पंचनामा करूनही आजतागायत शेतकर्‍यांना काहीही मदत नाही. त्यामुळे शासनाबद्दल शेतकर्‍यांत नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी व गावकरी करीत आहेत. परिसरात अजूनही पावसाचा जोर कायम असून, शेतकरी आपली उरलेली पिके सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
Powered By Sangraha 9.0