दुष्काळाची छाया गडद : सुधारित पैसेवारी सुद्धा ४८ पैसे

31 Oct 2025 11:24:05
अकाेला,
Akola crop compensation जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपात शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झालेले असतानाच जिल्ह्यातील २०२५ या वर्षातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी महसूल विभागाने गुरुवार ३० ऑक्टोबर रोजी ४८ पैसे जाहीर केली आहे.या आधी नजरंदाज पैसेवारी सुद्धा ४८ पैसे जाहीर करण्यात आली होती.आता ३१ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येणार असून त्याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.
 

Akola crop compensation  
खरीप हंगामात Akola crop compensation जिल्ह्यात सततचा पाऊस, अतिवृष्टी झाली.त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.जून ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर पिकांचे नुकसान झाले.तर ऑक्टोबर मध्ये परतीच्या पावसामुळे सोयाबीन व कापूस देखील भिजला.त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास देखील हिरावला. याचा परिणाम शेतमालाच्या उत्पादनाावर झाला आहे.दरम्यान ३० ऑक्टाेबर राेजी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सुधारित पैसेवारी सरासरी ४८ पैसे जाहीर केली.पैसेवारी ५० टक्क्यांच्या खाली निघाल्यास पीक परिस्थिती गंभीर व ५० टक्क्यांच्यावर निघाल्यास पीक परिस्थिती उत्तम असे पैसेवारीचे समीकरण आहे. आता डिसेंबर मध्ये अंतिम पैसेवारी जाहीर होईल.दुष्काळ जाहीर झाल्यास कर्ज पुर्नगठण, सक्तीचा कर्ज वसुली न हाेणे, शालेय शुल्क, शेतसारा आदीबाबत दिलासा देता येताे.
 
 
डिसेंबर महिन्यात अंतिम पैसेवारी
३० सप्टेंबर रोजी नजरअंदाज पैसेवारी जाहीर झाली. त्यानंतर आता ऑक्टाेबरमध्ये सुधारित पैसेवारी समाेर आली.आता डिसेंबर अखेर पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येईल पैसेवारीच्या आधारावर शासन दुष्काळाची परिसीमा ठरवत असते.त्यामुळे डिसेंबर महिन्यात अंतीम चित्र स्पष्ट हाेणार आहे.पन्नास च्या आत पैसेवारी येणे म्हणजे दुष्काळाचा मार्ग प्रशस्त होणार आहे.
 
 
सुधारित पैसेवारी
तालुका गाव पैसेवारी
अकाेला १८१ ४९
अकाेट १८५ ४८
तेल्हारा १०६ ४७
बाळापूर १०३ ४७
पातूर ९४ ४७
मूर्तिजापूर १६४ ४७
बार्शीटाकळी १५७ ४९
एकूण ९९० ४८
Powered By Sangraha 9.0