रामकृष्ण वाघ कॉलेजमध्ये उत्साहात दिवाळी व एकता दिन

31 Oct 2025 17:18:46
नागपूर,
Ramakrishna Wagh College छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये दिवाळी उत्सव आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “राष्ट्रीय एकता दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात लक्ष्मी आणि सरस्वती मातेच्या पूजनाने झाली. संगीत विभाग प्रमुख प्रा. सचिन देशमुख आणि प्रा. हर्षल रोठे यांनी गीत सादर केले. दिवाळी मिलन कार्यक्रमांतर्गत रामकृष्ण वाघ कॉलेज, सरस्वती महाविद्यालय आणि सरस्वती गर्ल्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सांस्कृतिक उपक्रम राबवले गेले.
 
Ramakrishna Wagh College
 
संस्थापक सचिव डॉ. मारोती वाघ, प्रभारी प्राचार्य प्रा. पंकज झगडे, तसेच विभाग प्रमुख प्राध्यापकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. अध्यक्षीय मनोगतात डॉ. वाघ यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. Ramakrishna Wagh College कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभांगी वाघ यांनी तर आभार प्रा. पल्लवी खंडारे यांनी मानले.
सौजन्य: सायली लाखे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0