डॉ.संपदा मुंडे प्रकरणी मेडिकल चौकात कॅण्डल मार्च

31 Oct 2025 12:21:50
नागपूर,
Dr. Sampada Munde फलटण येथील जिल्हा उपरुग्णालयातील महिला डॉ. संपदा मुंडे यांनी स्थानिक पोलीस अधिकारी व काही राजकीय व्यक्तींच्या सततच्या छळामुळे व अत्याचारामुळे आत्महत्या केल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ आज नागपूरातील मेडिकल चौक येथे कॅण्डल मार्च आयोजित करण्यात आला.

dr 
 
अत्याचारामुळे एक प्रतिभावान महिला डॉक्टरला आत्महत्येस प्रवृत्त व्हावे लागले, ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि समाजाला हादरवणारी असल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले. Dr. Sampada Munde  या वेळी आयोजक रौनक चौधरी,, सामाजिक कार्यकर्ते सुरेश जिचकार, रोमा चौधरी, समीर तिमांडे, सुहास नानवटकर, लतिफ शेख, चिराग चौधरी, आशुतोष रामटेके,आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
सौजन्य:अंशुल जिचकार,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0