अलर्ट जारी! देशभरात पुन्हा एकदा पावसाचा इशारा

31 Oct 2025 09:16:43
नवी दिल्ली,
heavy rainfall warning मोथा चक्रीवादळाचा प्रभाव आता हळूहळू कमी होत असला तरी देशात पुन्हा एकदा हवामानातील बदल पाहायला मिळत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार देशातील अनेक राज्यांमध्ये नव्याने निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विविध राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
 
 
heavy rainfall warning
अनेक ठिकाणी मुसळधार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांमध्ये पूर्वोत्तर भारतात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपूरा या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागांमध्ये आधीच पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, नव्या पावसाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
 
 
 
दक्षिण भारतातही heavy rainfall warning हवामानातील बदलांचा परिणाम दिसून येत आहे. आंध्र प्रदेशासह तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राजस्थानमध्ये मात्र ढगाळ वातावरण राहणार असून, अधूनमधून पावसाच्या सरी कोसळू शकतात, असे हवामान विभागाने म्हटले आहे.दरम्यान, महाराष्ट्रात पुढील एक ते दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर नाशिक, नंदुरबार, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
 
 
 
 
मराठवाडा विभागालाही पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या भागात मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरीही पावसाचा जोर कमी झालेला नसून, पुढील काही दिवस मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.हवामानातील या नव्या बदलामुळे शेतकरी, प्रवासी आणि नागरिकांनी सतर्कता बाळगावी, तसेच आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन भारतीय हवामान विभागाने केले आहे. प्रशासनाकडूनही आवश्यक तयारी ठेवण्यात आली असून, आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पथके सज्ज ठेवली गेली आहेत.
Powered By Sangraha 9.0