कारंजात जेलभरो आंदोलन ; आंदोलनकर्ते स्थानबद्ध

31 Oct 2025 19:15:55
कारंजा लाड,
jail wide protest घोषित केल्याप्रमाणे कर्जमाफी देऊन शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करा, शेतकर्‍यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा, दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळावे, तसेच मच्छीमार आणि मेंढपाळांना न्याय द्यावा, या प्रमुख मागणीसाठी प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली २८ ऑटोबर रोजी महाएल्गार आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी कारंजात ३० ऑटोबर रोजी जेलभरो आंदोलन करण्यात आले.
 

mahelgar 
 
 
शेतकर्‍यांची कर्जमाफी करावी, त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळावे, मेंढपाळ व मच्छीमारांच्या समस्या सोडवाव्यात या मागणीसाठी गेल्या आठ महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी सत्तेत आलेल्या नेत्यांनी शेतकर्‍यांची कर्जमाफी केली जाईल, शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य भाव दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. मग हे आश्वासन सरकार पूर्ण का करत नाही, असा उलटप्रश्न विचारून जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही, न्याय मिळत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही असा निर्धार नागपूर येथील आंदोलनात व्यक्त करण्यात आला आहे. नागपूर येथील महाएल्गार आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी कारंजात जेलभरो आंदोलन करण्यात आले.jail wide protest या जेलभरो आंदोलनात ओमप्रकाश तापडिया, गजानन अमदाबादकर गोपाल ठाकरे, प्रमोद ठाकरे, राजू बिजवल, विश्वास देशमुख, श्रीकृष्ण नेमाने आणि पुंडलीक कडू सहभागी झाल्याने पोलिसांनी कारंजा शहर पोलिस स्टेशन मध्ये त्यांना स्थानबद्ध केले.
Powered By Sangraha 9.0