महाक्रिटिकॉन राज्यस्तरीय परिषद 7 नोव्हेंबरपासून

31 Oct 2025 14:22:40
नागपूर,
mahacriticon state level conference इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनच्या नागपूर शाखेतर्फे 13वी महाक्रिटिकॉन ही राज्यस्तरीय परिषद 7 ते 9 नोव्हेंबर रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये आयोजित करण्यात आली आहे. मुख्य परिषद सुरू होण्यापूर्वी 2 नोव्हेंबरला आयएमए सभागृहात क्रिटिकल केअर नर्सिंग कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. या कार्यशाळेत प्रगत आयसीयू पद्धती, संक्रमण नियंत्रण, संकटाच्या वेळी संवाद व रुग्ण सुरक्षा यावर भर दिला जाईल. याच दिवशी ‘डायिंग विथ डिग्निटी’ या सामाजिक चर्चासत्राचे आयोजन होईल. यात जीवनाच्या शेवटच्या टप्प्यातील नैतिक, भावनिक व अध्यात्मिक पैलूंची चर्चा होईल.
 
 
 

cretical care 
 
 
शुक्रवारी 7 नोव्हेंबरला शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये तीन प्री-कॉन्फरन्स कार्यशाळा होतील. मुख्य परिषद 8 व 9 नोव्हेंबरला रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये होणार आहे. यात देश-विदेशातील तज्ज्ञ सेप्सिस मॅनेजमेंट, व्हेंटिलेशन, इसीएमओ, हेमोडायनॅमिक्स, ऑर्गन सपोर्ट यासारख्या विषयांवर व्याख्याने, वादविवाद, पॅनेल चर्चा घेतील. वैज्ञानिक पेपर, पोस्टर प्रेझेंटेशन, क्विझ, औद्योगिक प्रदर्शनही होईल.
महाक्रिटिकॉनचे उद््घाटन 8 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये एम्सचे कार्यकारी संचालक व ज्येष्ठ फिजिशिन्स डॉ. प्रशांत जोशी व एमएमसीचे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.mahacriticon state level conference डॉ. दीपक गोविल, डॉ. श्रीनिवास समवेदम, डॉ. प्रदीप रंगप्पा, डॉ. राजीव सोमण, डॉ. कपिल झिर्पे, डॉ. राहुल पंडित, डॉ. समीर जोग, डॉ. आशीष हेडगे, डॉ. शीला मैत्रा, डॉ. रणवीर सिंह त्यागी हे देशभरातील नामांकित तज्ज्ञ उपस्थित राहतील. डॉ. निखील बालंखे, डॉ. दीपक जेसवानी, डॉ. सुधीर चाफले, डॉ. आशीष गांजरे, डॉ. उत्कर्ष शाह, डॉ. कौस्तुभउपाध्ये, डॉ. आकाश बलकी आदींसह अनेक क्रिटिकल केअर तज्ज्ञ या परिषदेसाठी परिश्रम घेत आहेत.
Powered By Sangraha 9.0