मतदार संघाच्या विकासासाठी दोन कोटी रूपये मंजूर

31 Oct 2025 19:11:11
कारंजा लाड,
development of constituency कारंजा - मानोरा विधानसभा मतदार संघाच्या आमदार सई डहाके यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मतदार संघातील विकासकामांसाठी २८ ऑटोबर रोजी पुन्हा दोन कोटी रुपये मंजूर झाले आहे. कारंजा नगर परिषद हद्दीतील विकासकामांसाठी पाच कोटी रुपये मंजूर झाल्यानंतर लगेच हे दोन कोटी मंजूर झाल्याने मतदार संघात विकासनिधीचा वर्षाव होत असल्याचे दिसून येत आहे.
 
 

dahake 
 
 
आमदार सई डहाके ह्या पायाला भिंगरी बांधून मतदार संघ फिरत आहेत. यादरम्यान विकासकामांचा जाणवणारा अभाव पाहून त्या सातत्याने शासनाकडे विकासकामासाठी निधी मंजुर करावा यासाठी धडपड करत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यश देखील प्राप्त होत आहे. मागील १४ ऑटोबर रोजी कारंजा नगर परिषद अंतर्गत ५ कोटी रुपयांच्या विकासकामांना त्यांनी मंजुरी मिळवून आणली होती. त्यापाठोपाठ २८ ऑटोबर रोजी आमदार डहाके यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२५-२६ अंतर्गत विकासकामासाठी पुन्हा दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत.
या निधीमधून लवकरच कारंजा तालुयातील ऋषीकेश महाराज संस्थान वापटी कुपटी आणि लष्करी महाराज संस्थान भुलोडा येथे प्रत्येकी ३० लाख रुपये याप्रमाणे ६० लाख रुपये खर्चून भक्तांसाठी पोचमार्ग तयार करण्यात येईल.development of constituency तसेच खोलेश्वर संस्थान कारंजा येथे ४० लाख रुपयांचे मुलभुत सुविधा व अनुषंगिक कामे, श्री गजानन महाराज संस्थान उंबर्डा बाजार ता. कारंजा येथे २० लाख तर श्री सोमनाथ महाराज संस्थान आसोला मानोरा आणि श्री पिंपरी हनुमान संस्थान मानोरा येथे प्रत्येकी ३० लाख रुपये प्रमाणे ६० लाखांची मुलभुत सुविधा व अनुषंगिक कामे केली जाणार आहे. तर श्री काशिनाथ संस्थान परिसरात वाईगौळ येथे २० लाख रुपयांची मुलभुत सुविधा व अनुषंगिक कामे करण्यात येणार आहे. दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून धार्मिक स्थळाच्या प्रलंबित असलेल्या या विकास मागणीसाठी निधी मंजूर झाल्याने मतदार संघातील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.
Powered By Sangraha 9.0