‘रन फॉर युनिटी’ला उत्तम प्रतिसाद

31 Oct 2025 18:44:26
पारवा, 
यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर-आर्णी विधानसभा क्षेत्रातील घाटंजी तालुक्यातील आदिवासीबहुल क्षेत्र संबोधल्या जाणार्‍या पारवा येथे यवतमाळ जिल्हा पोलिस दलाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त शुक‘वार, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी 'Run for Unity'  ‘राष्ट्रीय एकता दौड’चे आयोजन करण्यात आले होते.
 

parva 
 
'Run for Unity'  दौडला शुक्रवारी पारवा पोलिस ठाण्यापासून सुरवात झाली. पारवा बसस्थानक ते बाबासाहेब पारवेकर कॉलेज ते चौफुली येथे समारोप करण्यात आला. याप्रसंगी पारवा पोलिसचे ठाणेदार संदीप नरसाळे व पोलिस ठाण्यातील कर्मचारीवृंद व बाबासाहेब पारवेकर कॉलेज महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, नागरिक, खेळाडू, स्वयंसेवी संस्था, क्रीडा मंडळे यांच्यासह पोलिस पाटील सहभागी झाले होते.
Powered By Sangraha 9.0