नागपूर,
Abhijat Bhasha Diwas : एलएडी आणि श्रीमती आर. पी. महिला महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा दिवस उत्साहात झाला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने करण्यात आली. मराठी विभाग प्रमुख प्रा. सबाना तडवी यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ऋता धर्माधिकारी, मानवविद्या शाखाप्रमुख डॉ. माधुरी पाटील यांचे स्वागत केले.
महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अभिवाचन, पोवाडा, भारुड, गोंधळ लोककला सादर करीत अभिजात मराठी भाषेचा गुणगौरव करीत मराठी संस्कृती, परंपरा आणि साहित्याचा इतिहास जागृत केला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. ऋता धर्माधिकारी सांगितले की, मराठी भाषेचा गोडवा मराठी मातीतच आहे. त्यामुळे मराठी भाषेचे संवर्धन, जतन करायला पाहिजे तसेच संस्कृतीला टिकून ठेवायचे असल्यास लोककलांचा वारसा चालवणे आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. पाठक, डॉ. माधवी बुटले, डॉ. विद्या बावणे, प्राध्यापक व विद्यार्थिनी परिश्रम घेतले.