मध्यवर्ती नागपूरमध्ये ‘एव्हिएशन हब’ होण्याची क्षमता

04 Oct 2025 17:45:21
नागपूर,
Nitin Gadkari मध्यवर्ती नागपूरच्या आकाशातून दररोज सुमारे १,५०० विमाने उडतात. आगामी काळात नागपूर विमानतळाचा पूर्णत:कायापालट होणार असल्याने आंतरराष्ट्रीय विमाने इंधन भरण्यासाठी उतरतील. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा विमानतळावर मिळणार आहे. देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूरमध्ये ‘एव्हिएशन हब’ होण्याची पूर्ण क्षमता हवाई वाहतूक क्षेत्रात प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही तडजोड न करता जबाबदारीने काम करण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
 

Nitin Gadkari  
एअर ट्रॅफिक कंट्रोलर गिल्ड ऑफ इंडियाच्या वतीने रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पाँईट येथे चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विकसित भारत २०४७ मध्ये वाहतुकीची भूमिका हा चर्चासत्राचा विषय होता. यावेळी प्रामुख्याने भारतीय विमान प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक योगीराज सोरते, एअर ट्रॅफिक कंट्रोलर गिल्ड ऑफ इंडियाचे महासचिव आलोक यादव, डॉ.विजय शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
विमान वाहतूक क्षेत्रात वेगाने परिवर्तन
 
 
नितीन गडकरी पुढे म्हणाले, हवाई वाहतूक व्यवस्थापनाच्या वाढत्या मागणीमुळे विमान वाहतूक क्षेत्रात वेगाने परिवर्तन होत आहे. सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज निर्माण झाली असून या क्षेत्राला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. ‘गेल्या दहा वर्षांमध्ये देशातील विमानतळांची संख्या ७५ वरून १५० झाली आहे. देहरादून ते दिल्ली या स्पाईस जेट्स विमान प्रवासात बायो एव्हिएशन फ्युएलचा वापर करण्यात आला आहे. देशाचा अन्नदाता शेतकरी आता परळी, राइस हस्क विमानासाठी बायो एव्हिएशन इंधन तयार करू शकतात.’
 
 

मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची गरज
एम्फिबीयस सीप्लेन अर्थात जमिनीवर आणि पाण्यावर चालणार्‍या छोटया विमानाची आवश्यकता वाढली आहे. जल आणि वायूमार्गाद्वारे प्रवासी वाहतूक खर्च किफायतशीर आणि जलद करणे काळाची गरज आहे.याकरिता दिशानिर्देश आणि मार्गदर्शक तत्त्वे उड्डयन क्षेत्राच्या तज्ञांद्वारे तयार करण्याची गरज आहे. वाहतूक क्षेत्रामध्ये अद्यावत तंत्रज्ञानाचे अंतर्भाव त्याचप्रमाणे प्रवासी वाहतुकीचा महसूल वाढवण्यासाठी नवनव्या योजनांचा या क्षेत्रातील हितधारकांनी विचार करावा,असेही त्यांनी नमुद केले.आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळाच्या धावपट्टीचे रिकार्पेटिंगचे केवळ सात आठ दिवसात करता येणे शक्य असताना विनाकारण दीड वर्षांचा कालावधी घेण्यात आला भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या हलगर्जीमुळे प्रवाशांना त्रास झाल्याचा अनुभव नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितला.
Powered By Sangraha 9.0