गांधी जयंतीनिमित्त कैद्यांमध्ये गांधी विचारांची रुजवात

04 Oct 2025 18:56:00
नागपूर ,
Central Jail Nagpur गांधी जयंतीचे औचित्य साधून मुंबई सर्वोदय मंडळ आणि सहयोग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर मध्यवर्ती कारागृहात “गांधी विचार परीक्षा” आयोजित करण्यात आली.या उपक्रमाचे मार्गदर्शन . अपर पोलीस महासंचालक, कारागृह व सुधार सेवाचे सुहास वारकेआणि विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई यांनी केले. कैद्यांमध्ये सुधारणा व पुनर्वसनाची भावना दृढ करण्यासाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात आला.एकूण १०३ कैद्यांनी परीक्षेत सहभाग नोंदविला, त्यात न्यायाधीन पुरुष बंदी २५, शिक्षा पुरुष बंदी ३६ आणि महिला बंदीवान ४२ यांचा समावेश होता.कारागृहाचे अधीक्षक. वैभव आगे यांच्या नेतृत्वात आणि अतिरिक्त अधीक्षक. दीपा आगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ तुरुंगाधिकारी आनंद पानसरे, बाळासाहेब शिंदे आणि मनोहर भोसले यांनी परीक्षेचे आयोजन यशस्वीरीत्या पार पाडले.गांधी विचार परीक्षेचे संयोजक आणि सहयोग ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रवींद्र भुसारी यांच्या संयोजनात ह्यूमन राईट्स अँड लॉ डिफेंडर्सच्या प्रमुख ॲड . स्मिता सिंगलकर आणि श्वेता सलील जैन यांनी परीक्षा प्रक्रिया पूर्ण केली.
 
 
bandi
 
 
 
कैद्यांना अभ्यासासाठी ‘गांधी बापू’, ‘माझी जीवनकथा’ आणि ‘सत्याचे प्रयोग’ अर्थात गांधीजींची आत्मकथा ही पुस्तके इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेत देण्यात आली होती.Central Jail Nagpur उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कारागृह शिक्षक गणपत खोकले, मंगेश देशमुख तसेच सामाजिक कार्यकर्ते धनपाल मेश्राम, कृष्णा पाडवी आणि मीना लाटकर यांनी विशेष सहकार्य केले.गांधी विचार परीक्षेत सहभागी सर्व कैद्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असून, प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना खादी वस्त्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे संयोजक डॉ. भुसारी यांनी सांगितले.
सौजन्य:डॉ. रवींद्र भुसारी,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0