मुख्यमंत्री अल्पकालीन अभ्यासक्रम योजनेत पोलिस कर्मचार्‍यांचा होणार समावेश

04 Oct 2025 19:26:33
वर्धा,
Dr. Pankaj Bhoyar सामान्य नागरिकांसोबतच शासनाच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना सोयी सुविधा देण्यासाठी ना. डॉ. पंकज भोयर सतत नवनव्या संकल्पना अंमलात आणत आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे आता पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचारी व पोलिस पाटलांच्या पाल्यांना मुख्यमंत्री अल्पकालीन अभ्याक्रमांतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत उद्योगासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण दिल्या जाणार आहे.
 

Dr. Pankaj Bhoyar   
गृह राज्यमंत्री तथा वर्धा व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कुटूंबीयांच्या समस्या जाणून घेण्याचा उपक्रम संपूर्ण राज्यात सुरू केला आहे. या उपक्रमाची सर्वत्र स्तुती होत असताना आता त्यांनी पोलिस अधिकारी, कर्मचारी व पोलिस पाटलांच्या पाल्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविण्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांना निवेदन देऊन मुख्यमंत्री अल्पकालीन अभ्याक्रम योजनेमध्ये त्यांचा समावेश करण्याची मागणी केली होती. सदर योजना कौशल्य विकास विभागाच्यावतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत चालविण्यात येत आहे. या योजनेत पोलिस अधिकारी, कर्मचारी व पोलिस पाटलांच्या पाल्यांचा समावेश करून त्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिल्यास त्यांची व्याप्ती वाढेल व स्वंयरोजगारसाठी मार्गदर्शन मिळेल यासाठी पुढाकार घेतला होता.
 
 


कौशल्य विकासमंत्र्यांनी केली स्तुती
 
 
ना. भोयर यांनी मांडलेल्या संकल्पनेची कौशल्य, रोजगार, उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्तुती करीत मुख्यमंत्री अल्पकालीन अभ्यासक्रम योजनेमध्ये पोलिस अधिकारी, कर्मचारी व पोलिस पाटलांच्या पाल्यांचा समावेश केला आहे. शासकीय औद्योगिक संस्थेचे प्राचार्य व निर्देशक संबंधित पोलिस आयुत, पोलिस अधीक्षक कार्यालय, पोलिस स्टेशन, एसडीपीओ कार्यालयाशी संपर्क करून योजनेची इंत्यभूत माहिती देतील. तसेच इच्छूकांची नाव नोंदणी करतील, असे कळविले आहे. या संदर्भात गृह विभागाकडून देखील संबंधितांना सूचना देण्यात याव्या, तसेच प्रत्येक पोलिस स्टेशन व महसूल विभाग निहाय एक समन्वयक नियुत करण्याची सूचना केली आहे.
Powered By Sangraha 9.0