दीपस्तंभने भरली निराधारांची ओटी

04 Oct 2025 16:54:29
नागपूर,
deepsthamb-social-organization दीपस्तंभ सामाजिक संस्था आणि आरोग्य भारती नागपूर महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने दत्त मंदिर, आयटी पार्क रोड येथे ‘नारीशक्ती सन्मान कार्यक्रम’ पार पडला. या कार्यक्रमात १०१ विधवा व निराधार महिलांची ओटी भरून नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला.घरातील कर्ता पुरुष गमावल्याने संकटात सापडलेल्या महिलांना देवीचे रूप समजून त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रत्येक महिलेला साडी-चोळी देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलविण्यात आले.
 
vidhva
 
 या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना सन्मान आणि आधार देणे हा आहे. संपूर्ण नवरात्रोत्सवात दीपस्तंभतर्फे अशा विधवा निराधार महिलांना साडीचोळी देऊन “नारी सन्मान” हा उपक्रम राबविण्यात येत आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. रवींद्र क्षीरसागर यांनी केले. deepsthamb-social-organization प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. निशा भुसारी, डॉ. सुरेखा वानखेडे, डॉ. मुरलीधर इढोळे, अमित सिब्बल, प्रा. किशोर फिरके, यवनलाल चौधरी, विनोद मेहरे, वर्षा मानकर व सपना रोडी उपस्थित होते.प्रास्ताविक व संचालन नंदकिशोर मानकर यांनी केले तर आभार लक्ष्मी विजयवार यांनी मानले.
सौजन्य : सपना रोडी, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0