अतिवृष्टीमुळे विहीर खचल्याने शेतकर्‍याचे नुकसान

04 Oct 2025 18:33:32
कारंजा लाड,
heavy rain तालुक्यात सलग होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. इंझा येथील शेतकरी गजानन चौधरी यांच्या सर्वे नं. ६७ मधील विहीर खचल्याने मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे विहीरीची माती वाहून गेली असून बाजूचे बांधकाम कोसळले आहे.
 
 

पाऊस  
 
 
गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने परिसरातील शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. शेतकरी गजानन चौधरी यांनी पिकाला पाणी देण्यासाठी मोठ्या मेहनतीने व खर्च करून ही विहीर बांधली होती. परंतु मुसळधार पावसामुळे पाण्याचा जोर प्रचंड वाढला आणि विहीरीच्या कडेला असलेली माती व दगड कोसळून पूर्ण विहीर धोकादायक अवस्थेत गेली आहे. या दुर्घटनेमुळे चौधरी कुटुंबावर मोठा आर्थिक डोंगर कोसळला आहे. विहीरीच्या बांधकामासाठी घेतलेले कर्ज फेडणे कठीण झाले आहे. पिकासाठी पाणी उपलब्ध करून देणारा हा मुख्य स्त्रोत नष्ट झाल्यामुळे आगामी हगामात पिकाची लागवड धोक्यात येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.heavy rain ग्रामस्थ व शेजारी शेतकरी यांनी या घटनेची पाहणी करून शेतकरी गजानन चौधरी यांना धीर दिला. मात्र शेतकर्‍यांच्या या संकटावर शासनाने तातडीने मदत जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी चौधरी यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0