कर्क राशीत गुरुचे संक्रमण...'या' राशींचा आर्थिक ताण वाढणार

04 Oct 2025 09:08:45
Jupiter transit in Cancer गुरु ग्रह सध्या आपल्या सामान्य गतीपेक्षा अधिक वेगाने भ्रमण करत आहे आणि येत्या १८ ऑक्टोबर रोजी तो आपल्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या ग्रहबदलाचा सर्व राशींवर परिणाम होणार असला तरी वृषभ आणि सिंह राशींसाठी हा काळ विशेषतः सावधगिरीचा ठरणार आहे. आर्थिक व्यवहार, घरगुती खर्च आणि वैयक्तिक निर्णयांमध्ये संयम आणि विचारपूर्वक पावले उचलणे आवश्यक आहे.
 
 
Jupiter transit in Cancer
 
वृषभ राशीच्या व्यक्तींना गुरुच्या या भ्रमणामुळे अचानक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. घरगुती खर्च वाढण्याची शक्यता आहे आणि कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्यामुळे बजेट बिघडू शकते. पैशाचे व्यवहार करताना अतिशय काळजी घेणे गरजेचे आहे, कारण छोटीशी चूक देखील मोठं नुकसान घडवू शकते. तसेच, कामाच्या ठिकाणी बोलताना संयम बाळगणे महत्त्वाचे ठरेल. वाद टाळल्यास प्रतिमा चांगली राहील. या काळात मात्र लहान भावंडांकडून मदत आणि साथ मिळण्याची शक्यता आहे.
 
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी गुरुचे बाराव्या घरातील भ्रमण खर्च आणि नुकसान वाढवणारे ठरू शकते. घर, वाहन किंवा इतर मोठ्या गोष्टींवर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. घरातील तरुण सदस्यांच्या मागण्या पूर्ण करताना अनावश्यक खर्च वाढेल. या काळात प्रवास टाळावा, कारण मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे. मात्र या सर्व गोंधळातही गुरुची उपस्थिती आध्यात्मिक वाढीस हातभार लावेल. ध्यान, योग आणि आत्मचिंतनाच्या माध्यमातून मनःशांती आणि योग्य निर्णयक्षमता प्राप्त होईल.
Powered By Sangraha 9.0