वर्धा,
Kumud Sharma हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या पवित्र उद्देशाने १९७५ मध्ये हिंदी विद्यापिठाच्या स्थापनेची कल्पना पुढे आली. भारतासाठी हिंदी विश्वविद्यापीठ वर्धेत तर जगासाठी मॉरिशस येथे विद्यापिठाची स्थापना झाली. महात्मा गांधींच्या आदर्श सिद्धांतावर हे विद्यापीठ चालते आहे. आपण दिल्लीतून वर्धेत आलो आहोत. तेथे धावपळीचे आयुष्य आहे. येथे निसर्ग मुतहस्ताने उधळण करते आहे. विदर्भाच्या भुमीत कालिदासांचे मेघदूत संदेश वाहक आहेत. हिंदी विद्यापिठात भाषा, संस्कृती, संगीत, साहित्य उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांमधील प्रतिभांना चालना देत हे विद्यापीठ गुलजार व्हावे यासाठी आपले प्रयत्न असल्याची माहिती महात्मा गांधी आंतर राष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कुमुद शर्मा यांनी तरुण भारतला खास मुलाखत देताना सांगितले.
हिंदी भारताची संस्कृती दर्शवते. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठात भारतातून विद्यार्थी येतात. उंचसखल भागात शेकडो एकर परिसरात असलेल्या या विद्यापिठाचे सौंदर्य अप्रतिम आहे. येथे भाषा, संस्कृती, संगीत, साहित्य एकत्र असल्याने येथे मनुष्य संस्कारीत होतो. हे विद्यापीठ गुलजार व्हावे अशी आपली कल्पना असल्याचे त्यांनी सांगितले. येथील शिक्षणासाठी आपण सात दिवस चोवीस तास उपलब्ध आहोत. सकाळी ९ वाजता कार्यालयात आल्यावर काम संपल्यानंतरच आपण कार्यालय सोडत असल्याचे त्यांनी सांगितले. आपण सर्वांची बाजू ऐकून घेऊ पण नियमांचे उल्लंघन करणार्यांना शिक्षेला पुढे जावे लागेल असे कुलगुरू कुमुद शर्मा म्हणाल्या. राष्ट्रीय शिक्षा निती आवश्यक आहे. देशापुढे वैश्विक आव्हान आहे. त्यावर कौशल्य विकास शिक्षणाची गरज आहे. आत्मनिर्भर भारतासाठी कौशल्य विकास आवश्यक आहे. देशाचे नेतृत्व स्वदेशीचा नारा देते आहे.
त्यातूनच आत्मनिर्भर भारत तयार होणार होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यत केला. आमच्या हिंदी विश्व विद्यापिठातून आत्मनिर्भर होऊन विद्यार्थी निघावा यासाठी आम्ही नियोजन करतो आहोत. येथे संगीत, चित्रकला आणि नृत्य या विषयाला चालना देण्यात येईल. संगीत, चित्रकला आणि नृत्याला भाषेची अडसर नाही. आपल्याला वेळ घालवायला आवडत नाही. शिक्षण, संस्कृती आणि भाषेचे बंधन न येऊ देता पुढे जायचे आहे. जीवन उत्सव आहे. उत्सव आवाज आणि आवाहन देतो. त्यातूनच येथील महात्मा गांधी हिंदी विश्व विद्यापीठ सप्तरंगांची उधळण करेल, असा विश्वास त्यांनी व्यत केला.