'भाई तूने धक्का क्यों दिया' आणि मग हत्या

04 Oct 2025 13:50:16
अनिल कांबळे

नागपूर,
Nagpur murder मिरवणूक बघत असताना फक्त धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन दाेन भावंडांनी एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने एका युवकाचा चाकूने भाेसकून खून केला. ही थरारक घटना गुरुवारी रात्री 9 वाजता मिनीमातानगरातील सार्वजनिक रस्त्यावर घडली. देवेंद्र अजय चाैव्हाण (वय 26, मुळगाव दयालपूर, उत्तरप्रदेश, ह.मु. मिनीमातानगर) असे हत्याकांडातील मृत युवकाचे नाव आहे. तर आदित्य नितेश चाचेरकर (21), आकाश उफर् टाेचू नितेश चाचेरकर (20, दाेन्ही रा. मिनीमातानगर) अशी आराेपींची नावे आहेत. आराेपींना बुधवारपर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात सहभागी अल्पवयीन मुलालासुद्धा पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 

Nagpur murder 
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमना पाेलिस ठाणे हद्दीतील मिनीमातानगर, गल्ली नंबर 6 येथे दुर्गेश लालजी चाैव्हाण (36) राहतात. ते काच िफटिंगची कामे करतात. देवेंद्र चाैव्हाण हा दुर्गेश यांच्या घरी मागील तीन वर्षांपासून भाड्याने राहत हाेता. तसेच त्यांच्या काच िफटिंगच्या कामात मदत करायचा. दरम्यान, गुरूवारी रात्री दुर्गेश आणि देवेंद्र हे दाेघेही मिनीमातानगरातील ईलिमेन्टस हार्माेनी, हाेम अ‍ॅण्ड द डिझाईनर स्टुडियाे ईमारतीसमाेर रस्त्यावर दुर्गा देवीच्या विसर्जनाची मिरवणूक बघण्यासाठी उभे हाेते. यावेळी, आराेपी आदित्य आणि आकाश चाचेरकर या भावंडासह एक विधीसंघर्षग्रस्त बालक हे मिरवणूक बघण्यासाठी आले. दरम्यान, देवेंद्र याचा आदित्यला धक्का लागला. यावरून दाेघांमध्ये वाद झाला. यावेळी, आदित्य, आकाश आणि त्याच्या साथिदाराने देवेंद्र तसेच दुर्गेश या दाेघांना शिवीगाळ करीत हातबुक्कीने मारहाण केली. आराेपी आकाशने देवेंद्रला पकडून ठेवले आणि आदित्यने विधीसंघर्षग्रस्त बालकाजवळ असलेला चाकू घेऊन देवेंद्रवर सपासप वार करीत त्याला ठार केले आणि पळून गेले. काही नागरिकांनी पाेलिसांना माहिती दिली. पाेलिसांनी देवेंद्रला खासगी रुग्णालयात नंतर मेयाे रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी मृत घाेषित केले. याप्रकरणी दुर्गेश यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक राऊत यांनी आराेपींविरूद्ध गुन्हा दाखल केला. चार तासांच्या आत आराेपी आदित्य व आकाशला अटक केली तर विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. आराेपींना पाच दिवस काेठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
Powered By Sangraha 9.0