तभा वृत्तसेवा
पुसद,
pusad-dj-permission : पुसद तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात डीजे वाजवण्यावर बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची तालुक्यातील चारही पोलिस ठाण्यांमार्फत अंमलबजावणी केल्या जात आहे. परंतु न्यायालयाच्या आदेशाला विविध मंडळांच्या अध्यक्षांसह पदाधिकाèयांकडून केराची टोपली दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
डीजेशिवाय दुर्गादेवीचे विसर्जन होणार नाही या निर्णयावर मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी ठाम आहेत. राज्यमंत्र्यांनी देखील हस्तक्षेप करीत विसर्जन करण्याची विनंती केली. परंतु त्यांच्याही शब्दाला मंडळाच्या पदाधिकाèयांनी मान दिला नाही. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील विसर्जन मिरवणूक पूर्ण तयारी करूनदेखील शनिवार, 4 ऑक्टोबर रोजी निघू शकलेली नाही.
याबाबत सूत्रांनुसार, दहा दिवसांच्या महोत्सवानंतर दुर्गादेवीची शनिवारी विसर्जन प्रक्रिया पार पडणार होती. शहरातील दुर्गादेवी मंडळाच्या अध्यक्षासह पदाधिकाèयांनी पूर्ण तयारीदेखील केली होती. त्यासाठी शहरासह ग्रामीण भागात पोलिसदेखील दाखल झाले होते.
पुस नदीकाठी पुसद नगर पालिकेच्यावतीने ठिकठिकाणी दिव्यांची व्यवस्थादेखील केली होती. दुर्गा स्थापनेच्या वेळीच परवानगी देताना डीजे लावता येणार नाही असे पोलिसांकडून स्पष्ट सांगण्यात आले होते. असे असतानादेखील मंडळांनी डीजेसाठी अॅडव्हान्सदेखील दिला होता.
पोलिसांमार्फत वारंवार सूचना देऊनदेखील ग्रामीण भागांत डीजे वाजविल्या जात होते. त्यामुळे पोलिसांनी शुक्रवारी ग्रामीण भागात विसर्जन मिरवणुकीत वाजणारे चार डीजे जप्त केले होते. शहरासह ग्रामीण भागातील 13 डीजे पोलिसांनी जप्त करीत शहर पोलिस ठाण्यात आणून जमा केले होते.
शनिवार, 4 ऑक्टोबर रोजी विसर्जन असताना सकाळी 7 पासूनच महाकाली चौकात सर्व मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. पोलिस अधिकारीसुद्धा मंडळ पदाधिकाèयांची समजूत काढण्यासाठी उपस्थित झाले होते.
यावेली त्यांना नियम व आदेश दाखविण्यात आले होते. परंतु डीजे वाजविण्यावर ठाम राहिल्याने अपर जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक थोरात हेसुद्धा पुसदमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर महाकाली चौकात जाऊन सर्वांची समजूत काढत आदेशांचे पालन करावे असे सांगण्यात आले होते. तरीदेखील कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
त्यानंतर दुपारी 1.30 च्या दरम्यान राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनीही महाकाली चौकात येऊन मंडळ पदाधिकाèयांची समजूत काढीत विसर्जन करण्याची विनंती केली. मी तुमच्यासोबतच आहे असेही त्यांनी सांगितले होते. पण त्यांच्या शब्दालादेखील मंडळांमार्फत मान देण्यात आला नव्हता.
वृत्त लिहोस्तोवर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कुठल्याही मोठ्या दुर्गा मंडळाचे विसर्जन झाले नव्हते. त्यामुळे डीजेशिवाय दुर्गा मंडळाचे विसर्जन होणार का, याकडे शहरातील जनतेसह पोलिसांचे लक्ष लागले आहे.