रामकृष्ण वाघ महाविद्यालयाला समूह गायनात पाचवे पारितोषिक

04 Oct 2025 18:56:39
नागपूर,
Ramakrishna Wagh College राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गांधी विचारधारा विभागांतर्गत आयोजित समूह गायन स्पर्धेत रामकृष्ण वाघ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेले पाचवे नामांकन पारितोषिक प्रा. कुलगुरूंच्या हस्ते प्राप्त झाले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव डॉक्टर वाघ आणि लता वाघ यांचे मौल्यवान मार्गदर्शन लाभले. प्राचार्य पंकज झगडे आणि संपूर्ण सहकारी प्राध्यापकांचे योगदानही महत्त्वाचे ठरले.
 
Ramakrishna Wagh College
 
संगीत विभाग प्रमुख सह. प्रा. सचिन देशमुख आणि सह. प्रा. हर्षद रोठे यांचे प्रयत्न विद्यार्थ्यांच्या यशात फळावले. बीए, बीबीए आणि बीसीसी विभागातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सक्रिय सहभाग नोंदविला. Ramakrishna Wagh College विशेषतः ऋतुजा खोबरागडे, सुचिता मेश्राम, अंजली शुक्ला, भूमी देशकर, वैष्णवी बडवाईक, सुप्रिया ठाकरे, रुचिता ठाकरे, मोनाली महल्ले, रुचिता जांभुळकर आणि पायल बेहेनिया यांनी स्पर्धेत यशस्वी सहभाग दाखवला. संस्थेच्या संस्थापक सचिव, प्राचार्य आणि शिक्षक वर्गाच्या मार्गदर्शनामुळे आणि विद्यार्थ्यांच्या कष्टामुळे हा यशस्वी अनुभव साकार झाला.
सौजन्य: सायली लाखे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0