वर्धा,
Vijayadashami राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर्धा नगराचा विजयादशमी उत्सव ५ रोजी स्थानिक केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर ६.१५ मिनिटांनी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी रा. स्व. संघाचे अ. भा. कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी यांचे प्रबोधन होणार असुन प्रमुख पाहुणे म्हणून आकार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश चन्नावार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्ष झाल्यानिमित्त विजयादशमी उत्सवाला विशेष महत्त्व आहे. त्यानिमित्ताने जंगी तयारी सुरू आहे. विजयादशमीला सकाळी शहरात शाखानिहाय विविध भागातून पथसंचलन काढण्यात आले. कार्यक्रमापुर्वी केसरीमल कन्या शाळा येथुन घोषपथकासह पथ संचलन काढण्यात येणार आहे. हे पथसंचलन शिवाजी चौक, बढे चौक, अष्टभुजा मंदिर चौक, वंजारी चौक, इंगोले चौक मार्गे केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर पथसंचालनाचा समारोप होईल. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगर संघ चालक डॉ. प्रसाद देशमुख यांनी केले आहे.