नागपूर,
Shri Nivruttinath Badminton Club श्री निवृत्तीनाथ बॅडमिंटन क्लब, ओम नगर तर्फे ३, ४ व ५ ऑक्टोबर रोजी “फ्रेंडली मॅचेस” चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात क्लबचे वरिष्ठ सदस्य तसेच जुन्या आणि नवीन मिळून सुमारे ५० खेळाडूंनी सहभाग घेतला.या स्पर्धेचा उद्देश खेळाडूंमध्ये आपुलकी, मैत्रीपूर्ण वातावरण, आत्मविश्वास निर्माण करणे तसेच सुदृढ आणि निरोगी जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणे हा होता. यात सर्वसामान्य खेळाडूंबरोबरच वयोवृद्ध सदस्यांनाही खेळाची संधी देण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर महापालिका क्रीडा प्रमुख पियुष आंबुलकर, माजी नगरसेविका व भाजपा महिला शहराध्यक्षा दिव्या धुरडे, वरिष्ठ नागरिक विनोद जैन, विद्यादान प्रतिष्ठान ठाणेचे नागपूर, प्रतिनिधी इंगोले परिवार आणि भाजपा मंत्री दक्षिण नागपूर विकी कोंबे यांच्या हस्ते झाले.Shri Nivruttinath Badminton Club कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील अंबागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अक्षय कढीखाये यांनी मानले. सर्व आयोजक व हितचिंतकांनी सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
सौजन्य:सारंग टोपरे,संपर्क मित्र