उत्तर प्रदेश,
Ghaziabad crime news गाझियाबादमधील नंदग्राम परिसरातील सिकरोड भागात राहणाऱ्या ३० वर्षीय ट्रकचालक मनीषची हत्या त्याच्या पत्नीनेच केल्याचे उघड झाले आहे. नंदग्राम पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत शुक्रवारी हत्येचा पर्दाफाश केला. पतीच्या वर्तणुकीने त्रस्त झालेल्या सुनीता हिने, पतीने तिच्यावर व मुलींवर अपशब्द उच्चारल्यामुळे संतापून हत्या केल्याची कबुली दिली आहे.
२९ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास नंदग्राम परिसरातील भट्टा नंबर ५ रोडलगत एका मोकळ्या प्लॉटमध्ये मनीषचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी प्राथमिक तपासात मनीषच्या पत्नीच्या तक्रारीवरून त्याचे मित्र अक्षय आणि भोला यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र तपासादरम्यान या दोघांचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.
नंदग्रामचे Ghaziabad crime news एसीपी उपासना पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष व सुनीता हे काही दिवसांपासून गुड्डू नावाच्या व्यक्तीच्या भाड्याच्या घरात राहत होते. मनीषला मद्यपानाचे व्यसन होते आणि २८ सप्टेंबर रोजी त्याने मद्यपानासाठी घरातील फ्रीज विकून टाकला होता. त्यानंतर तो आपल्या मित्र अक्षयसोबत सोम बाजार येथील दारूच्या दुकानाजवळ गेला होता. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळे सुनीता त्याच्या शोधासाठी बाहेर पडली आणि त्याला त्या ठिकाणी गाठले.सुनीता हिने मनीषला घरी परतण्यास सांगितले, मात्र तो नकार देत तिथेच थांबला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाच्या तावातावात मनीषने सुनीता आणि त्यांच्या दोन मुलींविषयी अपमानास्पद शब्द वापरले. त्यामुळे संतप्त झालेल्या सुनीता हिने आजूबाजूला पडलेल्या ईंटांपैकी एक उचलून मनीषच्या डोक्यावर जोरदार वार केला. त्यानंतर त्याच्या डोळ्यांवर आणि चेहऱ्यावरही वार करून त्याचा खून केला.
घटनेनंतर सुनीता घाबरून घरी परतली. तिच्या अंगावरील कपडे रक्ताने माखलेले होते. तिने ते कपडे धुऊन ठेवले आणि सकाळी पुन्हा बाहेर पडून पतीच्या शोधाचा बनाव केला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत गुन्ह्याच्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फूटेज आणि अन्य तांत्रिक पुरावे जमा केल्यावर सुनीता पोलिसांच्या संशयाच्या केंद्रात आली. चौकशीत तिने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.सध्या आरोपी पत्नीविरोधात हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस अधिक तपास करत असून न्यायालयीन कारवाईही लवकरच अपेक्षित आहे.