विदर्भस्तरीय किशोर कुमार स्मृती गीत गायन स्पर्धा ११ रोजी

04 Oct 2025 17:10:25
वर्धा, 
singing competition सृजन म्युझिकल व जय महाकाली शिक्षण संस्था वर्धा यांच्या संयुत वतीने ११ रोजी विदर्भस्तरीय किशोर कुमार स्मृती गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा युवा, बाल आणि ज्येष्ठ अशा तीन गटामध्ये आयोजित असून विजेत्यांना आकर्षक पुरस्कार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे.
 

singing compition 
 
 
शिवशंकर सभागृह अग्निहोत्री कॉलेज कॅम्पस रामनगर वर्धा येथे आयोजित स्पर्धा सकाळी १० वाजता सुरू होईल.
उद्घाटन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्या हस्ते होणार असून या स्पर्धेला हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत पार्श्वगायिका अनुपमा देशपांडे (स्व. किशोर कुमार यांच्या सह-गायिका) उपस्थित राहणार आहेत. युवा गटात १६ ते ५०, बाल गटात १ ते १५ तर ज्येष्ठ गटात ५१ ते १०० वयोगटातील गायकांचा सहभाग राहणार आहे. विजेत्यांना प्रथम, द्बितीय, तृतीय, चतुर्थ आणि पाचवे बक्षिस तसेच प्रोत्साहन पुरस्काराचे वितरणही करण्यात येणार आहेत. युवा गटातील टॉप पाच स्पर्धकांचा १२ ऑटोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता अंतिम सामना घेण्यात येईल. अंतिम सामन्याचे परीक्षण सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुपमा देशपांडे आणि दीपा देशपांडे (मुंबई) करतील. विजेत्या स्पर्धकाला अनुपमा देशपांडे यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात येईल. तसेच विजेत्या स्पर्धकाला अनुपमा देशपांडे यांच्यासोबत त्यांच्याच कार्यक्रमात गाणी गाण्याची संधी मिळणार आहे.
या स्पर्धेअंतर्गत दरवर्षी दिल्या जाणारा सृजन जीवन गौरव पुरस्कार वर्धा जिल्ह्यातील सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी तसेच केलेल्या लक्षणीय कार्याची दखल घेत यावर्षीचा सृजन जीवन गौरव पुरस्कार २०२५ येथील ज्येष्ठ कलावंत (तबलावादक) रविंद्र खाडे यांना जाहीर करण्यात आलेला आहे.singing competition हा पुरस्कार रविवार १२ रोजी संध्याकाळी ७ वाजता पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री, पार्श्वगायिका अनुपमा देशपांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. या स्पर्धेत विदर्भातील सर्व वयोगटातील हौशी कलाकारांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन स्पर्धेचे संयोजक शशिकांत बागडदे आणि पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0