पुलगाव,
Akshay Mahure पुलगाव येथील अक्षय माहुरे हत्याकांडात पोलिसांनी ५ आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून इतर चौघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना ८ ऑटोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अक्षयचा खून प्रेमसंबंधामुळेच झाल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. पुलगावच्या चिंतामणी कॉलनी परिसरात अक्षय महादेव माहुरे (२४) याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोयावर जड वस्तूने वार करून त्याचा खून करण्यात आला. मृतकाची आई संगीता माहुरे यांच्या तक्रारीवरून पुलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अक्षयने आईकडून ३ हजार रुपये घेऊन तो घराबाहेर पडला होता. पण, रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. अक्षयचे एका महिलेशी प्रेमसंबंध होते आणि त्यावरून वाद होऊन त्याचा खून करण्यात आला. आरोपींनी मध्यरात्री त्याच्या डोयावर दगडाने वार करून त्याला ठार केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पुलगाव पोलिसांनी सुरूवातीला तीन पुरूषांना आणि नंतर दोन महिलांना ताब्यात घेतले. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. श्रेयस घनमोडे (२२), परेश उर्फ बाब्या वाघाडे (२०), शिल्पा मेश्राम (३४) आणि माधुरी दिवे (२९) सर्व राहणार कवठा (झोपडी) अशी चार आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून रताने माखलेला दगड जप्त केला आहे. पुढील तपास ठाणेदार यशवंत सोळसे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मदनकर करीत आहेत.