अनिल कांबळे
नागपूर,
Ambazari hookah parlor raid अंबाझरी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत कॅेच्या नावावर सुरु असलेल्या हश हेज (एचएच) हुक्का पार्लरवर पाेलिसांनी छापा घातला. या प्रकरणी कॅेच्या संचालकासह तिघांवर पाेलिसांनी गुन्हे दाखल केले. कॅेत टाकलेल्या छाप्यात पाेलिसांनी 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अभय मनाेहर राठाेड (22, रविनगर, सिव्हीललाईन), निशांत राजेश पाटील (21, प्रतापनगर), सामीन एकर धाबक (20) अशी आराेपींची नावे आहेत. यासह अन्य कॅेतही काही पाेलिस कर्मचाèयांच्या आशिर्वादाने हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती समाेर आली आहे.
पाेलिस आयुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल यांनी ङ्कऑपरेशन थंडरङ्ख राबवून शहरातून हुक्का पार्लर आणि एमडी विक्री करणाèयांवर अंकुश ठेवला आहे. मात्र, काही पाेलिस कर्मचारी अजुनही हुक्का पार्लरच्या संचालकांशी मैत्रीपूर्ण संबंध जाेपासून आहेत. अंबाझरी पाेलिसांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हश हेज कॅेत छापा टाकला. छाप्यात येथे अभय राठाेड, निशांत पाटील आणि सामीन धाबक हे तिघेही ग्राहकांना प्रतिबंधीत तंबाखुजन्य हुक्का पदार्थ सेवनाकरिता पुरविताना सापडले. यावेळी, कॅेमध्ये 29 ग्राहक हुक्क्याचे झुरके घेत हाेते. कॅेमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लरचा कारभार राजराेसपणे सुरू हाता. कारवाईत पाेलिसांनी आराेपींच्या ताब्यातून हुक्का पार्लरकरीता उपयाेगात येणारे साहित्य, हुक्का पाॅट, वेगवेगळे फफफफ्लेव्हरचे तंबाखू व ईतर साहित्य असा 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आराेपींविरूद्ध कलम 274 भान्यासं सहकलम 5, 6, 7, 20 सिगारेट आणि ईतर तंबाखू उत्पादने अधिनियम 2003 महाराष्ट्र सुधारणा अधिनीयम 2018 अन्वये गुन्हा दाखल केला.