मुंबई
Shura Khan बॉलिवूड अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अरबाज खान पुन्हा एकदा वडील झाला आहे. त्याची दुसरी पत्नी शूरा खान हिने नुकतीच एका गोंडस मुलीला जन्म दिला असून, या आनंदाच्या बातमीने खान कुटुंबात जल्लोषाचं वातावरण आहे. ही बातमी अद्याप अधिकृतरीत्या अरबाजने जाहीर केलेली नसली, तरी माध्यमांच्या अहवालानुसार 4 ऑक्टोबर रोजी शूरा खान हिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि तिने तिथेच एका आरोग्यदायी मुलीला जन्म दिला.
अरबाज खान याने वयाच्या 58 व्या वर्षी दुसऱ्यांदा पित्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याआधी जून महिन्यात अरबाज आणि शूरा यांनी गरोदरपणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करत आनंद व्यक्त केला होता. आता त्यांची प्रतिक्षा संपली असून, दोघांनी त्यांच्या पहिल्या मुलीचं स्वागत केलं आहे.एका मुलाखतीत अरबाजने सांगितलं होतं की, "मी थोडा घाबरलेलो आहे आणि खूप आनंदी देखील आहे. बऱ्याच वर्षांनी मी पुन्हा वडील होत आहे, त्यामुळे ही भावना माझ्यासाठी खूप खास आहे. ही एक नवीन जबाबदारी आहे आणि मी तिची आतुरतेने वाट पाहत आहे."