महागाव,
cremation ground issue बारभाई (तांडा) येथील नागरिकांच्या नशिबी मरणानंतरही हालअपेष्टा येत आहेत. तांड्यात जागेअभावी स्मशानभूमी नसल्यामुळे ग्रामस्थांना अंत्यसंस्कारासाठी दुसèया गावाच्या स्मशानभूमीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी मृतदेह घेऊन जाणे आणि तेथे अंत्यसंस्कार पार पाडणे, हा एक वेदनादायी आणि सन्मानहीन अनुभव बनला आहे. ‘मृत्यूनंतरही प्रेताची अवहेलना’ होत असल्याची तीव्र भावना बारभाई (तांडा) येथील नागरिक व्यक्त करत असून, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन याठिकाणी स्मशानभूमीकरिता जागा उपलब्ध करून दहनशेडचे बांधकाम करण्याची मागणी केल्या जात आहे.
महागाव cremation ground issue तालुक्यातील हिवरासंगम गटग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या व जवळपास अकराशे लोकसंख्या असलेल्या बारभाई (तांडा) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही स्मशानभूमीसाठी अद्याप जागा उपलब्ध नसल्याने डोंगराच्या बाजूला असलेल्या जागेवर उघड्यावर अंत्यसंस्कार केल्या जात आहे. परंतु पावसाळ्याच्या दिवसात तांड्यातील कोणाचा मृत्यू झाल्यास मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी बाजूच्या लेवा गावाच्या स्मशानभूमीचा आधार घ्यावा लागत आहे. अशीच घटना 26 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता येथील झिंगुजी जाधव यांचे निधन झाले. शनिवार, 27 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. परंतु रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू असल्याने सकाळी अंत्यसंस्कार कसे करायचे हा मोठा पेच नातेवाईक व गावकèयांसमोर निर्माण झाला होता. त्याचवेळी गावकèयांनी लेवा येथील पोलिस पाटील गणेशराव देशमुख यांच्याशी संपर्क करून तेथील स्मशानभुमीतील दहन शेडमध्ये अंत्यसंस्कार करू देण्याची विनंती केली. देशमुख यांनी गावकèयांशी चर्चा करून तत्काळ मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी दिली.
एकीकडे cremation ground issue नागरिक आपल्या जवळच्या व्यक्तीच्या निधनाच्या दुःखात असताना दुसरीकडे स्मशानभूमीच्या अभावामुळे होणारी ही धावपळ त्यांच्या दुःखात भर घालत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, मृतदेहांना सन्मानाने अखेरचा निरोप देणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. पण प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे तो हिरावला जात आहे.प्रशासनाने बारभाई (तांडा) येथे तातडीने स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि लवकरात लवकर त्याचे बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
‘मतं घेता, पण मूलभूत सुविधा विसरता’
बारभाई (तांडा) येथील ग्रामस्थांमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासिनतेबद्दल तीव्र संताप आहे. स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत सदस्य ते आमदार, खासदारांपर्यंत सर्वांनी या गंभीर प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. निवडणुकीच्या वेळी मतं मागण्यासाठी येतात, पण तांड्यातील नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास विसरता, असा रोष येथील नागरिकांनी व्यक्त केला.
पावसाळ्यात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पाऊस बंद होण्याची वाट पाहावी लागते. पाऊस उघडला नाही तर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठी अडचण होत आहे. त्यामुळे ‘प्रेताची अवहेलना’ थांबवण्यासाठी प्रशासनाने आतातरी संवेदनशीलपणे या समस्येची दखल घेऊन तातडीने स्मशानभूमीसाठी हक्काची जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी दहानशेडची उभारणी करून द्यावी.
- संगीता शंकर पवार
ग्रा. पं. सदस्य हिवरासंगम
बारभाई येथे जिप सदस्य विलास भुसारे यांच्या विकास निधीमधून दहनशेड मंजूर करण्यात आली होती. परंतु जागेअभावी त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. ही जागा महसूल व वन हद्दीत येत असल्याने ती स्मशानभूमीसाठी उपलब्ध व्हावी याकरिता जिल्हाधिकाèयांकडे पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर महसूल व वनविभागाकडे परवानगी देण्यासंदर्भात पत्र आल्याची माहिती असून दोन्ही विभागांच्या परवानगी अजून मिळणे बाकी आहे. परवानगी मिळाल्यानंतर या ठिकाणी स्वतंत्र स्मशानभूमी निर्माण करण्याचा मार्ग सुकर होईल.
- शरद कदम
उपसरपंच, हिवरासंगम