कोषटवार विद्यालयात तक्रार निवारण समूह स्थापन

05 Oct 2025 16:28:19
तभा वृत्तसेवा पुसद,
Koshatwar school कोषटवार विद्यालयात विद्यार्थी समूह उपक्रमांतर्गत शाळेचे मुख्याध्यापक गजानन वायकुळे यांच्या मार्गदर्शनात तक्रार निवारण समूह स्थापन करण्यात आला.
 

 Koshatwar school 
 
 
 
तक्रार निवारण समूहाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. विद्यार्थ्यांमधून अध्यक्ष समृद्धी परमेश्वर कोटावार, उपाध्यक्ष आस्था मनोज लोथे, सचिव आस्था सागर पंडितकर यांना घोषित करण्यात आले. सदस्य म्हणून प्रत्येक वर्गातून काही विद्यार्थी समूहामध्ये घेण्यात आले.
तक्रार निवारण समूहाचे समन्वयक शिक्षक म्हणून विजय पाटील हे काम पाहणार आहेत. कल्पना आडे, जयश्री पोलशेट्टीवार, ममता गंधेवार, शिल्पा अनंतवार, प्रीती येल्हेकर व संतोष मारकड इत्यादी शिक्षकसुद्धा या समूहात काम पाहणार आहेत.कल्पना आडे यांनी तक्रार म्हणजे नेमके काय, तक्रार निवारण समितीची उद्दिष्टे, कार्यपद्धती, नियम व जबाबदाèया या सर्व गोष्टीची माहिती सांगितली व विद्यार्थ्यांना त्यांच्या काही तक्रारी असतील तर तक्रार पेटीत टाकण्याचे आवाहन केले. शाळेच्या उपमुख्याध्यापक रीता बघे, पर्यवेक्षक बलराम मुराडी, अनंत जाधव यांचे सहकार्य लाभले.
Powered By Sangraha 9.0